यास्मिन शेख

पुढील गमतीदार वाक्ये वाचा-

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

१) ती अभिनेत्री भयंकर सुंदर आहे. २) त्याला श्रीखंड भयंकर आवडते. ३) भारतापेक्षा अमेरिकेतील रस्त्यांवर भयंकर स्वच्छता असते. या तीनही वाक्यांत ‘भयंकर’ हे विशेषण अनुक्रमे अभिनेत्री, श्रीखंड, स्वच्छता या विशेष्यांचे आहे. संस्कृत ‘भयानक’ या शब्दाचे भयंकर (वि.) असेही रूप आहे. भयंकर (वि.) या शब्दाचा अर्थ आहे- भय उत्पन्न करणारा, भयावह, भीतीदायक, घोर, दारुण. सौंदर्य, श्रीखंड, स्वच्छता या गोष्टी भीतीदायक कशा असतील? सौंदर्य हे मनमोहक असते, श्रीखंड चवदार तर स्वच्छता हवीहवीशी वाटणारी असते, पण ‘भयंकर’ हा शब्द वर दिलेल्या नामांसाठी वा ‘भयंकर हुशार’, ‘भयंकर विद्वान’ असे शब्दप्रयोगही मराठीजन वापरताना दिसतात. सौंदर्य, रुची, स्वच्छता या भीतीदायक गोष्टी नाहीत. उलट, या गोष्टी प्रतिकूल नसून अनुकूल आहेत, आनंददायी आहेत. ‘भयंकर’ या भीतीदायक शब्दाची सुंदर, सुखदायक, मनमोहक गोष्टींसाठी योजना करणे चुकीचे आणि खेदजनक आहे. ही वाक्ये अशी हवीत- १) ती अभिनेत्री अत्यंत हुशार आहे. २) त्याला श्रीखंड अतिशय (खूप) आवडते. ३) भारतापेक्षा अमेरिकेतील रस्त्यांवर अतिशय (विलक्षण) स्वच्छता आहे.

नावे लिहिताना होणाऱ्या चुका

मराठीत मुलामुलींची नावे आहेत, त्यांचे  उच्चार व लेखन बिनचूक केल्यास या नावांचा अर्थवाहीपणा खुलतो! काही उदाहरणे पाहू : अनुसया- चूक, अनसूया- बरोबर (अन् +असूया), उज्वला- चूक, उज्ज्वला- बरोबर, सुशिला- चूक, सुशीला- बरोबर, लिला- चूक, लीला- बरोबर, रुख्मिणी- चूक, रुक्मिणी- बरोबर, अरूंधती-चूक, अरुंधती-बरोबर, अहिल्या- चूक, अहल्या- बरोबर, दिपीका- चूक, दीपिका- बरोबर, उर्मी- चूक, ऊर्मी- बरोबर, प्रिती-चूक, प्रीती-बरोबर, निशीगंधा-चूक, निशिगंधा-बरोबर, संजिवनी-चूक, संजीवनी-बरोबर, अंबरीश-चूक, अंबरीष-बरोबर, अंशुमान-चूक, अंशुमन-बरोबर, अभिजीत- चूक, अभिजित-बरोबर, अवधुत- चूक, अवधूत- बरोबर, आशीश-चूक, आशीष- बरोबर, गिरिश- चूक, गिरीश- बरोबर, रिवद्र- चूक, रवींद्र- बरोबर, त्रिंबक- चूक, त्र्यंबक- बरोबर, दत्तात्रय- चूक, दत्तात्रेय- बरोबर, शरदचंद- चूक, शरच्चंद्र-बरोबर, निलेश- चूक, नीलेश- बरोबर, पीयुष-चूक, पीयूष- बरोबर, ऋषिकेश- चूक, हृषीकेश-बरोबर.