– डॉ. निधी पटवर्धन nidheepatwardhan@gmail.com

आयुष्यात औपचारिक-अनौपचारिक क्षणांना शुभेच्छा, अभिनंदन, आशीर्वाद, सांत्वन, सहवेदना कळवण्याची वेळ वारंवार येत असतेच. ‘प्लीज’, ’सॉरी’ आणि ‘थँक्यू’ या तीन शब्दांनी आयुष्यात जणू धुमाकूळ घातला आहे. प्लीजसाठी ‘कृपया’ हा औपचारिक शब्द अगदी सहज वापरात आहे. तो औपचारिक वाटतो म्हणूनच बोलीत तो ‘अरे जरा, सोबत येशील का?’ मधील ‘जरा’ या कृपया शब्दाच्या जवळ जाईल.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

‘सॉरी’ या शब्दासाठी संदर्भानुसार निरनिराळे पर्यायी शब्द वापरता येतात ते अधिक चांगले वाटतात. चुकले असल्यास सॉरीसाठी, ‘क्षमा करा, माझी चूक झाली’ किंवा ‘मी क्षमाप्रार्थी आहे, पुन्हा असे होणार नाही’, या म्हणण्याने जो प्रभाव पडेल तो ‘सॉरी’ या दोन अक्षरांनी मिळणार नाही. परंतु औपचारिकपणाने विशिष्ट भावनांसाठी विशिष्ट शब्दच वापरायला हवेत, ही पाश्चात्त्य कल्पना आपण स्वीकारली आणि त्या विशिष्ट शब्दांना अवाजवी महत्त्व आले, पण त्या शब्दांमागील भावना लोप पावल्या. कधी कधी तर ‘‘मी सॉरी म्हटलंय ना एकदा? आता आणखी कटकट करू नकोस.’’ अशी विचित्र चर्चा कानावर पडू लागली. 

कधी कधी ‘सॉरी’ या अर्थी एखाद्या दूरध्वनीवरून ध्वनिमुद्रित आवाज येतो. ‘आम्ही क्षमस्व आहोत’ असं वाक्य कानावर पडलं की द. दि. पुंडे यांचा ‘भयंकर सुंदर मराठी भाषा’ हा ललित लेखसंग्रह आठवतो! अगदी कोणी मनुष्य निवर्तले असे कळले तरी आजकाल समोरून ‘ओहह सॉरी.!’ असे येते. इथे ‘अरेरे, फार वाईट झाले! आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत’ असे सहजी तोंडून बाहेर पडू शकते. आरआयपी ( फकढ- रेस्ट इन पीस) ऐवजी ‘आत्म्यास सद्गती लाभो’, अशी प्रार्थना जवळची वाटते. ‘ऑफ झाले’ हा शब्द निधनाच्या वार्तेला पर्याय म्हणून बऱ्यापैकी वापरात येऊ लागला आहे. त्याऐवजी सामाजिक संदर्भात वारले, निधन झाले, बुद्धवासी झाले, ख्रिस्तवासी झाले, पैगंबरवासी झाले, देवाघरी गेले असे पर्याय उपयोगात आणले तर मानवी स्नेहबंध दृढ होण्यास मदत होते.

अत्र, तत्र, सर्वत्र ‘थँक्यू’ हा शब्द बोकांडी बसला आहे. अगदी नोकरदारांनी उपस्थितीचे बोट यंत्राला लावले तरीही यंत्रातून ‘थँक्यू’ असा आवाज येतो. एरवी जणू पावलोपावली हा शब्द सोबतीस असतो. तर इथे आभार, धन्यवाद, कृतज्ञता एवढंच नव्हे ‘बरं वाटलं, मन भरून आलं, छान वाटलं, किती बरं आभार मानू’ असे संदर्भानुसार पर्यायी शब्दरचना वापरता येऊ शकतात, ज्या तुमच्या भावना अधिक नेमकेपणाने समोरच्यापर्यंत पोहोचवतात. ज्ञानेश्वरीमध्येही दुसऱ्या अध्यायात ‘त्या चि उपकारें। होवोनि आभारी। तयाच्या जिव्हारीं। घाव घालूं ? ॥ ५९॥’ येथे ‘आभार’ शब्द आलेला आहे. भावनांचं प्रकटीकरण करण्यासाठी प्लीज, सॉरी, थँक्यू या तीन शब्दांचा औपचारिक आधार घेऊन केवळ उपचार पाळला जातो. आपली अभिव्यक्ती चांगली व्हावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असेल तर निरनिराळे पर्यायी शब्द संदर्भानुसार वापरणं आणि स्वत:ची शैली सिद्ध करणं हा अधिक चांगला पर्याय आहे असं वाटत नाही का?