– डॉ. माधवी वैद्य

राधिका खूप धाडसी मुलगी होती. धीट होती. तसे तिचे ज्ञान सखोल होते असे नाही. पण तिची मैत्रीण सानिका मात्र खरी हुशार, बुद्धिमान. तिचा अभ्यास चोख. पण ती स्वभावाने गरीब, जराशी लाजाळू. त्यामुळे राधिकाला ज्ञान कमी असूनही तिच्याच नावाचा उदोउदो जास्त होत असे.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स

त्या दोघींना शिकवणाऱ्या एका चाणाक्ष शिक्षिकेच्या ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला नाही. एकदा सानिका त्यांच्याकडे एक शंका घेऊन गेलेली असताना त्यांनी तिला विचारले, ‘‘सानिका! एक विचारू तुला? अगं तू इतकी हुशार आहेस. सगळं ज्ञान तुला असतं. मग अशी मागे मागे का राहतेस? तू बोललं पाहिजेस. आपले विचार, आपलं ज्ञान लोकांसमोर येऊन मांडलं पाहिजेस. ती तुझी मैत्रीण राधिका बघ. खरं तर तिच्याकडे ज्ञान कमी, दिखाऊपणाच जास्त आहे. उद्या अनेक जण तू वरचढ असूनही तुला मागे टाकतील. तुझी ‘झाकली मूठ सव्वा लाखाची आहे’ हे कोणाला कळणारही नाही. यात इतरांचं फावेल आणि तू मात्र मागे पडत जाशील.’’

हे बोलणे तिथे बसलेले आणखी एक शिक्षक ऐकत होते. ते म्हणाले, ‘‘बाई! तुम्ही तिला लाख मोलाची गोष्ट सांगत आहात. खरं आहे तुमचं म्हणणं. उथळ पाण्याला खळखळाटच फार! घडा पूर्ण भरलेला असेल तर आतलं पाणी न डुचमळता तो माथ्यावर नीटपणे वाहून नेला जाऊ शकतो. घडय़ातलं पाणी सांडत नाही की त्याचा आवाजही होत नाही. खरा ज्ञानी माणूस भरलेल्या घडय़ासारखा स्थिर असतो. तो आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करत नाही आणि व्यर्थ बडबडतही नाही. कारण त्याने मिळवलेलं ज्ञान बावनकशी असतं.’’ हा सारा संवाद सानिका फार लक्ष देऊन ऐकत होती. तिला वाटत होते ‘अपुरा घडा, झोले खाई’ हे राधिकाला केव्हा कळणार?

madhavivaidya@ymail.com