सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

दिल्ली सल्तनत आणि मुघल ऊर्फ मोगल साम्राज्याचे शासक खरेतर मूळचे मंगोल होते. मुगल हा फारसी शब्द आहे आणि त्याचा अर्थ ‘मंगोल’ असा आहे. या मंगोल लोकांचा मूळ प्रदेश मंगोलिया हा पूर्व आशियातला एक प्रजासत्ताक देश आहे. भारतात आक्रमक, राज्यकर्ते असलेल्या मुगलांना पुढे मोगल असे नाव झाले. उत्तरेस रशिया तर बाकी तिन्ही दिशांना चीन असा सर्व बाजूंनी दोन महासत्तांनी वेढलेला हा मंगोलिया देश जगातील सर्वात विरळ लोकवस्ती असलेला देश आहे. येथील लोकसंख्या घनता प्रति चौ.कि.मी. दोनहूनही कमी आहे! त्याचप्रमाणे मंगोलिया हा जगातला क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा परंतु सर्व बाजूंनी भूवेष्टित असा देश आहे, याला समुद्राचे सान्निध्य नाही. १५ लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या मंगोलियाची लोकसंख्या केवळ ३३ लाख आहे! उत्तरेत पर्वतीय प्रदेश तर दक्षिणेत गोबीचे वाळवंट असलेल्या मंगोलियाचा बराचसा प्रदेश गवताळ कुरणांनी व्यापलेला आहे. उलानबातर हे येथील राजधानीचे शहर. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकवस्ती या राजधानीच्या शहरात एकवटली आहे. सोळाव्या शतकात मंगोलियात तिबेटमार्गे बौद्ध धर्माने प्रवेश केला आणि पुढे त्याचा विस्तार झाला. विसाव्या शतकात हा देश कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनच्या नियंत्रणाखाली गेल्यावर बऱ्याच लोकांनी कोणत्याही धर्माचा स्वीकार न करता निधर्मीच राहणे पसंत केले. सध्या प्रजासत्ताक मंगोलियामध्ये एकूण लोकवस्तीपैकी ५१ टक्के बौद्ध धर्मीय, ४१ टक्के निधर्मी, चार टक्के इस्लामी आणि दोन टक्के ख्रिस्ती आहेत.

According to the United Nations Population Fund UNFPA report the estimated population of India is 144 crores
भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट
Loksatta chaturanga Discovery of Women Vote Bank
महिला व्होट बँकेचा शोध!
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

प्राचीन मंगोलियन इतिहासात उल्लेख आहे की सहाव्या शतकात दोन बौद्ध आचार्य भारतातून मंगोल टोळ्यांच्या प्रदेशात आले. येताना त्यांनी बरोबर बौद्ध सूत्रग्रंथ आणि बुद्धमूर्ती आणल्या होत्या. या प्रदेशात सहाव्या शतकात बौद्धमताचा प्रचार सुरू झाला. पुढच्या काळात भारतातून अनेक वेळा बौद्ध धर्माचार्य तिकडे गेले आणि तिकडचे अनेक धर्मज्ञान आणि संस्कृतचे अध्ययन, तसेच तीर्थयात्रा करण्यासाठी भारतात येत राहिले. मध्ययुगीन मंगोलियात बौद्धधर्माच्या प्रभावामुळे स्त्रीपुरुषांची नावे इन्द्री, रत्ना, जय जिमित्र, वज्रमपाणी, सुमेर अशी भारतीय पद्धतीची ठेवण्याची प्रथा होती, हे आज आपल्याला अविश्वसनीय वाटेल.