भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ही मूळची बगदादची, एका ज्यू कुटुंबातली. फरहात इझिकेल नादिरा हिचा जन्म १९३२ साली बगदादमध्ये झाला. फरहात ही फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली गेली. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिराने एकूण ६३ िहदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. ज्यू कुटुंबात जन्मलेली ही मुलगी दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होती. तिच्याच आग्रहामुळे नादिरा मुंबईत वयाच्या १९व्या वर्षी दाखल झाली आणि मेहबूब खानांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात तिला साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका दिली. ‘आन’मधील एका राजपूत राजकन्येच्या तिच्या भूमिकेनंतर तिच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील तिच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे तिला सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘श्री ४२०’मधील तिच्या ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भूमिकेने नादिराला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. नादिराच्या वेगळ्या, पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा तिचे वेगळेपण उठून दिसे. २००० साली प्रदíशत झालेला ‘जोश’ हा नादिराचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी नादिराच्या नशिबी एकटेपणा आला. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाइझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती. िहदी चित्रपटसृष्टीत त्या काळाच्या मानाने चांगला पसा कमावलेली नादिरा ही स्वत:कडे रोल्सराइस असलेली पहिली अभिनेत्री.  वयाच्या ७३व्या वर्षी मुंबईच्या भाटिया रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

सुनीत पोतनीस

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
aarti singh wedding rumors (1)
लाल साडी, केसात गजरा अन् घरी सजावट! गोविंदाच्या भाचीच्या लग्नाची तयारी सुरू, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Karan Sharma Ties Knot With actress Pooja Singh
Video: पाच वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, प्रसिद्ध अभिनेत्याने ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल

sunitpotnis@rediffmail.com 

 

कांचन

कालिदासाचा ‘कोविदार’ म्हणजेच कांचन, अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला, बागांमध्ये दिसू लागलाय. मध्यम आकाराचा हा सदापर्णी वृक्ष सुमारे ८-१० मीटपर्यंत वाढतो. पूर्णपणे स्वदेशी असलेल्या कांचनची प्रजाती आहे ‘बॉहिनिया’. सोळाव्या शतकातले वनस्पती शास्त्रज्ञ असलेले जॉन आणि कॅस्पर बॉहिन या जुळ्या भावंडांच्या सन्मानार्थ हे नाव दिले आहे. ‘बॉहिनिया’ प्रजातीतल्या झाडांची पाने वेगवेगळ्या लांबी-रुंदीची, कमी-अधिक हिरव्या छटांची किंवा कमी-जास्त जाडीची असली तरी या प्रजातीची खासियत म्हणजे लंबगोलाकार आणि मध्यभागी खाच असलेली पाने. पानाचे सारखे दोन भाग मध्यशिरेला जोडलेले असतात. त्यामुळे मध्यावर घडी पडणारे पान तयार होते आणि दोन पाने जोडल्यासारखी वाटतात. संस्कृतमध्ये अशा पानांना युग्मपत्र असे नाव आहे.

आपण दसऱ्याला सोनं वाटतो तो आपटाही याच प्रजातीतला. गरसमजुतीने काही ठिकाणी कांचनची पानेच सोने म्हणून देतात. आपटय़ाची आणि कांचनची पाने जोडपत्र असली तरी त्यात फरक आहे. आपटय़ाची पाने आकाराने लहान, गोलाकार, जाडसर आणि मळकट-हिरवी, तर कांचनची पाने मोठी तळव्याइतकी, लांबट, पातळ आणि हिरवीगार. आपटय़ाची फुले लहान, पिवळी, तर कांचनची फुले मोठी, कांचनमध्ये फुलांच्या रंगाप्रमाणे लालगुलाबी (रक्तकांचन), पांढरा (श्वेतकांचन), पिवळा कांचन, ठिपक्यांचा कांचन इत्यादी प्रकार आहेत.

आपल्या परिचयाचा आहे, तो ‘परप्युरीया’. म्हणजे गुलबट-जांभळ्या रंगाच्या फुलांवरून हे नाव दिलंय. थंडीमध्ये कांचनची पाने गळून पडतात आणि पंचकोनी, तपकिरी-हिरवट कळ्यांची टोके फांद्यांतून बाहेर येतात. पंजाच्या आकाराच्या फुलात पाच जांभळट-पांढऱ्या पाकळ्या असतात. त्यातली एक पाकळी जरा जास्त गडद असते. पाकळ्यांवर रेखीव गुलाबी शिरा असतात. पाच गुलाबी पुंकेसरांमध्ये गडद रंगाचे स्त्रीकेसर असते. फूल ऑर्किडच्या फुलाप्रमाणे दिसते. म्हणून कांचनला इंग्रजीत ‘ऑर्किड ट्री’ असे म्हणतात. फुलांना मंद सुवास असतो. बहर संपल्यावर झाडावर घेवडय़ासारख्या हिरव्या शेंगा लटकताना दिसतात.

कांचनच्या शेंगाची, पानांची कळ्या-फुलांची भाजीही करतात. सालीपासून धागा काढतात. लाकडापासून शेतकी अवजारे तयार करतात. आयुर्वेदात कांचनचे औषधी उपयोग बरेच दिले आहेत. रक्त-पित्त विकार, जुलाबासारख्या आजारांत कांचनचा उपयोग केला जातो.

चारुशीला जुईकर  (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org