वास्तववादी आणि सर्जनशील तमिळ लेखक म्हणून ओळख असलेले पी. व्ही. अखिलान्दम् ऊर्फ अकिलन यांना त्यांच्या ‘चित्तिरपावै’ या तमिळ कादंबरीसाठी १९७५चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९५९ ते १९६८ या कालावधीतील भारतीय भाषांत प्रकाशित झालेल्या सर्जनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती म्हणून ही निवड  होती. कादंबरीकार म्हणून त्यांचं नाव देश-विदेशातील तमिळ घराघरात पोहोचलं. तसंच त्यांच्या साहित्यकृतीचं अध्ययन आणि मूल्यांकन करण्यासाठी विद्यापीठं तसंच प्राध्यापकवर्गही आकृष्ट झालेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकिलन यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९२३ रोजी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यतील पेरुंगळूर या छोटय़ा गावात झाला. त्यांचे वडील  वनक्षेत्रपाल (फॉरेस्ट रेंजर) होते. अकिलन १९३८ मध्ये चौथ्या इयत्तेत शिकत असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या अकाली निधनाने परिस्थिती हलाखीची झाली. पण त्यांच्या आईने त्यांना सावरलं,  लेखनाला प्रोत्साहन दिलं. १९३९ मध्ये त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. १९४० मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यानंतर पुडुकोट्टाई येथील महाविद्यालयात प्री-डिग्रीचे विद्यार्थी म्हणून शिकत असतानाच म. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने भारावलेले अकिलन शिक्षण सोडून स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू झाल्यावर त्यांनी सरकारविरोधी कथा लिहायला सुरुवात केली. मित्रांच्या सहकार्याने शक्तीयुवासंघाची स्थापना केली. पुढे राष्ट्रीय सेवक संघाचे ते स्वयंसेवक होते. थोडय़ाच दिवसांत १९४३च्या सुमारास ते ‘इन्बम’ नावाच्या एका नव्यानेच सुरू झालेल्या नियतकालिकात साहायक संपादक म्हणून काम करू लागले. १९४४ मध्ये विवाह झाल्यावर मात्र कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन १९४५ मध्ये ते रेल्वे मेल सव्‍‌र्हिसमध्ये सॉर्टर म्हणून काम करू लागले. याच सुमारास त्यांनी ‘पेन’ ही पहिली कादंबरी लिहिली. ‘कलैमगल’ या तमिळ भाषेतील प्रसिद्ध मासिकाच्या स्पर्धेत या कादंबरीला प्रथम पुरस्कार मिळाला. मग लेखनाची ओढ इतकी विलक्षण होती की, अखेर १९५८ मध्ये अखिलन यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ लेखनच केलं. २० पुस्तकं  या काळात प्रसिद्ध झाली. लोकप्रियता मिळाली. पण कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत होत्या. त्यामुळे हे इतकं सोपं नव्हतं.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

संख्यालेखन  पद्धतीचे  पाये

संख्या लिहिण्यासाठी सध्या आपण जी पद्धती वापरत आहोत, ती म्हणजे दशमान पद्धत. भारतीय गणितज्ञांनी जगाला दिलेली देणगीच जणू. या पद्धतीत १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि ० अशी दहा चिन्हे वापरतात. वस्तू मोजताना दहा-दहाचे गट करून मोजतात. एका गटाला दशक म्हणतात, असे दहा दशक झाले की त्याला शतक, दहा शतकांचा एक गट म्हणजे सहस्र. म्हणजे प्रत्येक संख्या ही दहाच्या घातांच्या पटीपासून बनलेली असते.

उदा. ३२५८ = ३ सहस्र + २ शतक + ५ दशक + ८ एकक.

ही पद्धत स्थनिक किमतीवर आधारलेली आहे. कोणतीही संख्या ही तिच्यातल्या सर्व अंकांच्या स्थानिक किमतीच्या बेरजेइतकी असते.  प्रत्येक अंकाला स्वत:ची अशी एक दर्शनी किंमत असते. वरील उदाहरणात २ ची दर्शनी किंमत २ आहे; पण त्याची स्थानिक किंमत २ १०० म्हणजे २०० आहे. त्यामुळे केवळ दहाच चिन्हे वापरून आपल्याला हवी ती आणि वाटेल तेवढी मोठी संख्या अगदी सहज आणि थोडक्यात मांडणे दशमान पद्धतीमुळे शक्य झाले. इतकेच नव्हे तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ व घनमूळ काढणे इत्यादी अंकगणिती क्रियाही सुलभपणे करता येऊ लागल्या.

प्राचीन इजिप्शियन, ग्रीक, रोमन यांसारख्या पद्धती स्थानिक किमतीवर आधारित नसल्यामुळे त्या पद्धतींनी आकडेमोड वा मोजमापन करताना अनेक अडचणी येत. भारतीय दशमान पद्धती ही सर्वमान्य ठरली तरी परिपूर्णतेसाठी संख्यालेखन पद्धतीचा पाया दहाच असला पाहिजे, असे नाही. पाच, दहा, बारा, वीस यांसारखा कोणताही पाया चालण्यासारखा आहे. यापकी पाच हा फारच लहान व वीस हा फारच मोठा पाया म्हणून ते गरसोयीचे आहेत. दहाचा व बाराचा पाया वापरणे सोयीस्कर आहे. आपल्या हाताची बोटे दहा आहेत. त्यावरून आपल्या पूर्वजांना स्वाभाविकपणे दहाचा पाया सुचला असावा. तेच आपल्या इतके अंगवळणी पडले आहे की आता बाराचा पाया स्वीकारणे अशक्य वाटते.

५३+२४ ही बेरीज वेगवेगळ्या पायांमध्ये कशी केली जाते ते पाहू.

  • पाया दहा असताना : ५३+२४ = ७७

= (५  १० + ३) + (२ १० + ४) = ७७

  • पाया पाच असताना : ५३+२४ =४२

= (५  ५ + ३) + (२  ५ + ४) = ४२

  • पाया बारा असताना : ५३+२४ = ९१

= (५ १२ + ३) + (२  १२ + ४) = ९१

याशिवाय दोनाचा पाया, आठाचा पाया, सहाचा पाया वापरूनही संख्यालेखन करता येते. संगणकात दोन पाया असलेली द्विमान पद्धत वापरली जाते.

दि. य. कानविंदे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२  office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pv akilandam
First published on: 28-03-2017 at 03:38 IST