जगप्रसिद्ध अरबी घोडा आणि अरबी उंट हे पाळीव प्राणी सौदी अरेबियाचे एक वैशिष्ट्य समजले जात असले तरी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत येथील प्राणीजीवनात विविध प्राण्यांचा समावेश होता. त्यामध्ये अरेबियन चित्ता, लांडगा, आखूड शेपूट आणि कुत्र्यासारखे तोंड असलेला बबून वानर, सँड कॅट ऊर्फ वाळवंटी मांजर, बुलबुल पक्षी, जेरबोआ हा उड्या मारीत जाणारा उंदीर वगैरे दुर्मीळ प्राणी होते, परंतु पुढे मोठ्या प्रमाणात त्यांची शिकार होऊन ते या प्रदेशातून नामशेष झाले आहेत.

सध्याचा आधुनिक सौदी अरेबियाचा प्रदेश प्राचीन आणि मध्ययुगीन काळात ठळकपणे चार प्रदेशांमध्ये विभागला गेला होता. पश्चिमेचे हेजाझ, मध्य भागातले नज्द, पूर्वेकडील अल् अहसा आणि दक्षिणेकडील असीर. या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या जमातींची छोटी राज्ये, अमिराती, शेखसंस्थाने (इंग्रजीत शेखडम्स) होती. विसाव्या शतकात सौद या घराण्याचे अब्दुलअझीझ अल सौद ऊर्फ इब्न सौद यांनी या प्रदेशातील निरनिराळ्या राज्यसत्तांचे एकत्रीकरण करून अरबी द्वीपकल्पात किंगडम ऑफ सौदी अरेबिया स्थापन केले. इब्न सौद यांच्या सौद या राजघराण्यावरून या देशाचे नाव सौदी अरेबिया झाले.

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
impact of us foreign policy on semiconductor industry
चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग
China claim on Arunachal Pradesh and its hegemony strategy continues
लेख: चीनचा कावा वेळीच ओळखा..
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?

इ.स.पूर्व काळात अरबी द्वीपकल्पाच्या उत्तर प्रदेशात नबाती या भटक्या जमातींच्या लोकांची वस्ती होती आणि पुढे ते प्रबळ होऊन सध्याच्या सौदी अरब प्रदेशात त्यांनी राज्य स्थापन केले. पुढे रोमन लोकांनी नबातींवर आक्रमण करून हा प्रदेश रोमन साम्राज्यात सामील केला. रोमन सत्ताधाऱ्यांनी या प्रदेशाचे नामकरण अरेबिया पेट्राया असे केले. इ.स.६३० पर्यंत अरबी द्वीपकल्पाचा वायव्य आणि उत्तर प्रदेश रोमनांच्या कब्जात राहिला. सहाव्या शतकात रोमन साम्राज्य खिळखिळे झाले होते आणि या काळात या प्रदेशात सर्वत्र भटक्या जमातींच्या टोळ्यांच्या प्रमुखांचे वर्चस्व होते. या काळात पश्चिमेकडील मक्का आणि मदिना या गावांचा विस्तार होऊन तिथे व्यापारी वर्गाचा उदय झाला. या काळात इ.स. ५७१ मध्ये मक्का या गावात इस्लामचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला. त्यांनी सातव्या शतकाच्या सुरुवातीस सर्व अरबी जमातीच्या टोळ्यांमध्ये इस्लामची शिकवण देऊन समन्वय साधला, अरबी प्रदेशात एकसंघ इस्लामी समाज निर्माण केला. मक्का आणि परिसरावर त्यांचे शासनही स्थापन झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com