डॉ. माधवी वैद्य

नातवाने आजीकडे ‘आज्जी गोष्ट सांग ना!’ असा आग्रह धरला. आजीने त्याला गोष्ट सांगायला सुरुवात केली. ‘एकदा काय झालं.. एक जंगल होतं. त्यात एक भली मोठी मगर आणि एक कोल्हा रहात होता. त्या दोघांची खूपच दोस्ती झाली. एकदा कोल्ह्याने मगरीला आपल्या घरी जेवायला यायचं निमंत्रण दिलं. मग मगर त्याच्या घरी जेवायला गेली. पण कोल्हा होता लुच्चा. तो बसला झाडावर चढून! आणि खूप प्रेमाने त्या मगरीला म्हणू लागला. ‘ये ना गं मगरताई ! जेवायचा बेत तर तुझ्या वहिनीने इतका झक्कास केला आहे की विचारूच नकोस.’ पण मगर बिचारी झाडावर कशी चढणार? ती म्हणाली, ‘अरे कोल्हेदादा, मला नाही बाबा झाडावर चढता येणार.

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Former MLA Narayanarao Gavankar withdraws from Akola Lok Sabha constituency
माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

पण आपण असं मात्र करू शकतो की तूच ये माझ्याकडे जेवायला. चालेल? आणि माझं घरही काही फार लांब नाही, आहे थोडा चिखल पण तू येऊ शकशील. चिखलात एक बीळ आहे. तेच माझं घर.’ त्यालाही अद्दल घडवायचीच असं मनात ठरवून मगर तिथून निघाली. कोल्होबा ठरलेल्या वेळी गेले तिच्या घरी. तो धूर्त कोल्हा कसला फसतो! त्याने ओळखलं चिखलातल्या बिळासारखा भासणारा आपला जबडा उघडून ही बया आपली वाट बघत बसलेली आहे आणि तिचा आपल्याला खाण्याचा बेत आहे, तो म्हणाला, ‘‘मगरताई ! मला एक सांगशील का गं? अनेक जण कपाळाला टिळे लावतात पण मला तर तुझ्या कपाळावर दिसत आहेत दोन चमकते डोळे! हे कसं काय? बहुत देखिले टिळे टाळे पण चिखलास नाही डोळे ! नको रे बाबा ते जेवण!’’ आणि कोल्होबा तिथून पळाला. नातू आजीला म्हणाला, ‘‘कोल्हा भले बहाद्दर! त्याने हुशारीने आपला प्राण वाचवला!’’

madhavivaidya@ymail.com