वनस्पती अचल असतात. प्राणी मात्र चल म्हणजे फिरू शकणारे असल्याने आपला जोडीदार किंवा जोडीदारीण स्वत: शोधू शकतात व त्यांचे मीलन होते. त्यामुळे निसर्गाने वनस्पतिंमध्ये मीलन घडवून आणण्यासाठी अनेक आश्चर्यजनक योजना केल्या आहेत.
वनस्पतींमध्ये शुक्रनिर्मिती फुलांच्या पुंकेसरांत तर स्त्रीबीजनिर्मिती स्त्रीकेसरात होते. उभयिलगी फुलांमध्ये पुंकेसर तसेच स्त्रीकेसर असतात. तर काही फुलांत केवळ पुंकेसर असलेली नरपुष्पे असतात किंवा केवळ स्त्रीकेसर असलेली स्त्रीपुष्पे असतात.
निसर्ग परागकण विविध प्रकारे व वेगवेगळ्या दूतांमार्फत स्त्रीकेसरापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. परागकण स्त्रीकेसरात रुजल्यावर त्यातील शुक्राणूंचा स्त्रीबीजाशी संयोग होतो व बीजधारणा होते. अशा रीतीने वनस्पतींमधील विवाह सोहळा संपन्न होतो.
कित्येक उभयिलगी फुलांमध्ये जरी स्वत:च्याच परागकणांमुळे स्त्रीकेसराचे परागीभवन होत असले तरी निसर्ग अशा प्रकारचे सगोत्र विवाह टळण्यासाठी अनेक क्लृप्त्या योजताना दिसतो.
बटाटा, तंबाखू काही ऑर्किड्स आणि चहाच्या फुलांमध्ये स्वपरागीकरण झाले तरी बीजनिर्मिती होत नाही. जास्वंद, कोथिंबीर आणि सूर्यफूल यांच्या कुलातील फुलांचे स्त्री व पुरुष अवयव भिन्न वेळांना वयात येते असल्याने त्यांच्यात स्वपरागीभवन होऊ शकत नाही.
भिन्न फुलांमध्ये परागीकरण घडावे म्हणून निसर्ग विविध योजना करतो. यासाठी त्याला विशेष दूतांकरवी परागकण एका फुलाकडून दुसऱ्या फुलापर्यंत पोहोचवावे लागतात. हे दूत असतात वारा, पाणी किंवा विविध प्राणी ज्यांत कीटकांपासून ते गोगलगाय, पक्षी व वाघळांचा समावेश होतो. अगदी मनुष्यप्राणीही याला अपवाद नाही तोदेखील जाणता-अजाणता परागवहनाचे काम करतो.
वायुदूताने परागीभवन होणारी फुले लहानखुरी, अतिसामान्य रूपाची तसेच रंगहीन, गंधहीन व पुष्परस नसलेली अशी असून मोठय़ा प्रमाणात धूलिकणांसारख्या परागकणांची निर्मिती करतात. मका, गहू यांसारखी तृणधान्ये ओक, बीच, वोलो असे वृक्ष यांचे परागीभवन वाऱ्यामार्फत होते. पाईनवृक्षांच्या जंगलात पिवळ्या रंगाचे परागकण मोठय़ा प्रमाणात बाहेर पडतात. त्यांच्या अशा ढगांना ‘सल्फर शॉवर’ असे नाव दिले गेले आहे.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

नागर आख्यान : विभाजित बर्लिन
मे १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर बेचिराख झालेल्या बर्लिन शहराची अवस्था अत्यंत खराब झाली. शहरातली सहा लक्ष घरे बॉम्बिंगमुळे जमीनदोस्त झाली. युद्धापूर्वी ४३ लक्ष लोकसंख्या असलेल्या बर्लिनमध्ये केवळ २८ लक्ष नागरिक शिल्लक राहिले. महायुद्धातील जेते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि सोव्हिएत युनियन यांनी आपसात जर्मनीचा प्रदेश वाटून घेतला. बíलन शहरही पूर्व आणि पश्चिम असे विभागले गेले. पश्चिम जर्मनी ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या संयुक्त प्रशासनाखाली येऊन त्यामध्ये बíलनचा पश्चिम भाग अंतर्भूत झाला. पश्चिम जर्मनी आणि बíलनमध्ये १९४९ साली फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी हे सरकार स्थापन होऊन बॉन ही हंगामी राजधानी केली गेली. त्याच वर्षी सोव्हिएत युनियनच्या ताब्यातील पूर्व बर्लिनमध्ये जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक या सरकारची राजधानी झाली. रशियन कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असलेल्या पूर्व बíलनची हलाखीची आíथक परिस्थिती आणि शेजारच्या दोस्त राष्ट्रांचे सरकार असलेल्या पश्चिम जर्मनीची आíथक सुबत्ता ही दोन परस्परविरोधी टोके होती. पूर्व जर्मनीत जीवनावश्यक वस्तूंची असलेली टंचाई आणि आकाशाला भिडलेल्या किमती, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये कायम संशयी वृत्ती यामुळे पूर्व बíलनमधले लोक पश्चिमेत स्थलांतर करू लागले. १९६० साली वर्षभरात दोन लक्ष पूर्व बíलनवासींनी पश्चिम बíलनमध्ये स्थलांतर केले, तर जुल १९६१ या महिन्याभरात तीस हजार लोक पश्चिमेकडे राहावयास गेले. बऱ्याच वादविवादानंतर, पश्चिम बíलनमध्ये जाणाऱ्यांचा लोंढा थांबविण्यासाठी पूर्व बíलनच्या सोव्हिएत युनियनच्या सरकारने पूर्व आणि पश्चिम बíलनमध्ये ४३ कि.मी. लांबीची आणि चार मीटर उंचीची िभत बांधली. या िभतीवरील तारांच्या कुंपणातून वीजप्रवाह फिरवला गेला. पुढे रशियातले सोव्हिएत युनियनचे सरकार गडगडले आणि पूर्व बíलनकरांनी १९८९ साली ही प्रसिद्ध भिंत पाडून पूर्व आणि पश्चिम बíलनचे एकीकरण केले.
– सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com