lp36r  इलुगा मार्कला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता पॅनासोनिकने त्यापुढील व्हर्जन इलुगा मार्क टू बाजारात आणला आहे. विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या अलॉयच्या दर्जाच्या अल्युमिनिअमची संपूर्ण मेटल बॉडी असणारा हा मोबाइल फोन आकार आणि इतर अनेक नवीन वैशिष्टय़ांनी युक्त असा आहे. कव्‍‌र्ह्ड अ‍ॅशी ड्रॅगन ट्रेल ग्लासचा वापर यात केलेला असल्यामुळे याचा लुक तर बदलला आहेच, पण त्याचबरोबर स्क्रीनला ओरखडय़ांपासून अधिक संरक्षण मिळाले आहे.

* १३ मेगा पिक्सेल मागील कॅमेरा, फाइव्ह मेगापिक्सेल पुढील कॅमेरा.

* ५.५’’ एचडी डिस्प्ले, २.५ डी कव्‍‌र्ह्ड अ‍ॅशी ड्रॅगन ग्लास

* फिंगर प्रिंट स्कॅनर

* डय़ूअल सिम

* सेल्फी घेण्यासाठी सेन्सर टॅपिंगची सुविधा

* इन्फ्रारेड सेन्सर

* थ्री जीबी रॅम

* किंमत रु. १०,४९९/-

इलुगा प्राइम

lp38rलोकप्रिय अशा इलुगा मालिकेत पॅनासोनिकने इलुगा प्राइम हा नवा मोबाइल फोन बाजारात आणला आहे. सुरक्षा आणि त्याचबरोबर आकर्षक डिझाइन या दोन्ही गोष्टींचे एकत्रीकरण यामध्ये दिसून येते. ६४ बिट कॉड कोअर प्रोसेसर आणि थ्री जीबी रॅम या दोन्ही सुविधांमुळे मोबाइलवर अनेक अ‍ॅप वापरणे सहज शक्य होणार आहे. सोनेरी आणि चंदेरी अशा दोन्ही रंगात हा मोबाइल फोन उपलब्ध आहे.

* १३ मेगा पिक्सेल मागील कॅमेरा तिहेरी एलईडी फ्लॅशसह, फाइव्ह मेगापिक्सेल पुढील कॅमेरा.

* ५.५’’ एचडी डिस्प्ले, २.५ डी कव्‍‌र्हड अ‍ॅशी ड्रॅगन ग्लास

* फास्ट फिंगर प्रिंट स्कॅनर

* डय़ूअल सिम

* सेल्फी घेण्यासाठी सेन्सर टॅपिंगची सुविधा

* थ्री जीबी रॅम

* वजन: १४५ ग्रॅम

* किंमत रु. १०,२९०/-

सोनाटा अ‍ॅक्ट

lp37rअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोनाटा अ‍ॅक्ट हे नवीन घडय़ाळ टायटनने बाजारात आणले आहे. खास महिलांसाठी सुरक्षा अ‍ॅप असलेले हे घडय़ाळ वापरकर्त्यांच्या मोबाइलशी जोडलेले असता. सोनाटा    अ‍ॅक्ट -अ‍ॅप एनेबल्ड कोऑर्डिनेट्स ट्रॅकर हे तंत्र यामध्ये वापरण्यात आले आहे. सोनाटा अ‍ॅक्ट वापरणाऱ्याच्या स्मार्टफोनवर एका मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे जोडले जाते. ब्ल्यूटूथ तंत्राचा आधारे हे घडय़ाळ मोबाईलसोबत जोडले जाते. आधीपासून निर्धारित केलेल्या व्यक्तींच्या नेटवर्कवर घडय़ाळ वापरणाऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा एसएमएसच्या माध्यमातून पाठवले जातात. नोकरी व्यवसायानिमित्ताने कोठेही फिरणाऱ्या महिलांसाठी हे आधुनिक घडय़ाळ फायदेशीर ठरणारे आहे.  किंमत रु. २७४९/- ते रु. २९९९/-

प्रतिनिधी response.lokprabha@expressindia.com