मिझू टेक्नॉलॉजीने एमथ्री एस हा नवीन स्मार्टफोन लाँच केला.  सपाट, गुळगुळीत आणि नाजूक अशी या फोनची मेटल बॉडी आहे. मिझूचा नवा स्मार्टफोन चंदेरी, करडा, सोनेरी आणि रोझ गोल्ड या रंगांमध्ये उपलब्ध आहे. एमथ्री एसची स्क्रीन ५ इंच इतकी आहे. संपूर्ण लॅमिनेशन टेक्नॉलॉजी असल्यामुळे या फोनच्या स्क्रीनचा अनुभव वेगळाच येतो. या फोनचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेल तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल इतका आहे. यामध्ये लाँग एक्सपोझर, पॅनारोमा मोड असे फोटोग्राफीचे इतर पर्यायही उपलब्ध आहेत. रिअर आणि फ्रंट अशा दोन्ही कॅमेरा आणि त्यात असलेल्या विविध सुविधांमुळे फोटोग्राफीचा एक वेगळाच आनंद मिळतो. २.० अ‍ॅपरचरसह ५ मेगापिक्सेल असलेला फ्रंट कॅमेरा कमी प्रकाशातही सवरेत्कृष्ट परफॉर्मन्स देतो. अ‍ॅमबॅक आणि अ‍ॅमटच या सुविधा फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन आणि फिंगर पेमेंट असं एकत्रीकरण असल्यामुळे तुमचं आयुष्य आधीपेक्षा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. ५.१ अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा कोर ए ५३ प्रोसेसर आहे.

पॅनासॉनिकचे डीजे टेक्निकचे हेडफोन्स

पॅनासॉनिकने डीजे तंत्रज्ञान असलेले डीजे १२०० हे हेडफोन्स नुकतेच बाजारात आणले. त्यांची ध्वनिक्षमता उच्च दर्जाची आहे. यात ४१ एमएम ड्रायव्हर युनिट्स असून याची किंमत १२,९९९ रु. इतकी आहे. ज्या ग्राहकांना आवाजाच्या दर्जाची तडजोड केलेली पसंत नाही, खास अशांसाठी पॅनासॉनिकचे हे हेडफोन्स अतिशय उपयुक्त आहेत. १५०० एमडब्ल्यू इनपुट इतकी या हेडफोन्सची क्षमता आहे. या हेडफोनला २४के गोल्ड प्लेटेड प्लग आणि कॉपर क्लॅड अ‍ॅल्युमिनिअर वायर आहे. या हेडफोनचं डिझाइन फोल्डिंगचं केलेलं आहे. हेडफोन्ससोबत दिलेल्या एका काऊचमध्ये सोयीस्कररीत्या तुमच्यासोबत ते घेऊ शकता. या हेडफोन्ससोबत पॅडेड हेडबॅण्ड आहे; जेणेकरून डोक्याला घट्ट बसून हेडफोन्सचा मनमुराद आनंद घेता येईल. त्यामुळे संगीतप्रेमी असाल आणि आवाजाचा उत्तम दर्जा, सुविधा हव्या असतील तर पॅनासॉनिकच्या या नव्या हेडफोनचा पर्याय उत्तम आहे.

इंटेक्सचे नवे स्पीकर

इंटेक्स टेक्नॉलॉजीने त्यांची ५.१ चॅनल स्पीकरची सीरिज विस्तारित केली आहे. आयटी ६०५०एसयूएफ बीटी हे नवे स्पीकर इंटेक्सने लाँच केले आहे. या नव्या स्पीकर्समुळे ५.१ च्या सीरिजमध्ये आता १० मॉडेल्स उपलब्ध झाले आहेत. तर ४.१ सीरिजमध्ये १५ आणि २.१ सीरिजमध्ये २२ मॉडेल्स आहेत. या नव्या स्पीकरला यूएसबी पोर्ट, एसडी कार्ड स्लॉट आणि ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी आहे. तसंच या स्पीकरमध्येच एफएम टय़ुनरही समाविष्ट आहे. शिवाय डीव्हीडी/ पीसी/ एलसीडी टीव्हीसह एयूएक्स ऑडीओ इनपुटही आहे. स्पीकर्स वुडन बॉडीचे असल्यामुळे ते एकदम सुंदर दिसतात. ग्राहकाला डिजिटल एफएमचा अनुभव मिळावा यासाठी यात एलईडी डिस्प्लेही आहे. वापरण्यास अतिशय सोप्या असलेल्या या स्पीकर्सची रेंज सात ते दहा मीटर इतकी आहे. आयटी ६०५०एसयूएफ बीटी या ५.१ या सीरिजमधल्या नव्या स्पीकर्सची किंमत ६,६०० रुपये इतकी आहे.

वैशिष्टय़े :

  • आऊटपुट पॉवर : ५०डब्ल्यू + १५डब्ल्यू ७ ५
  • स्पीकर साइज : मुख्य युनिट- १५.२४ सेमी. आणि सॅटेलाइट- ७.६२ सेमी.
  • फ्रिक्वेन्सी रिसपॉन्स : मुख्य युनिट- २० एचझेड-२०० एचझेड, सॅटेलाइट- २०० एचझेड-२० एचझेड.
  • एफएम फ्रिक्वेन्सी : ८७.५ एमएचझेड ते १०८ एमएचझेड
  • इमिडन्स : मुख्य युनिट- ८, सॅटेलाइट- ४.
  • इनपुट अणि आऊटपुट जॅक : आरसीए जॅक
  • पॉवर सप्लाय : एसी २२० व्ही- २४० व्ही/५०-६० एचझेड
  • नेट वेट : ८.५ किलो.

पॅनासॉनिकचा पी ७५ स्मार्टफोन

पॅनासॉनिकने १५७ ग्रॅम्स इतक्या हलक्या वजनाचा पी ७५ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. याची किंमतही अतिशय कमी म्हणजे ५९९९ रु. इतकी आहे. या फोनची बॅटरी ५००० एमएएच इतकी आहे. ५ इंज एचडी आयपीएस असा या फोनचा डिस्प्ले आहे. ५.१ लॉलिपॉप अ‍ॅण्ड्रॉइड अशी ऑपरेटिंग सिस्टम असून १.३ गीगाहर्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसर आहे. १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल आणि एक्सपाण्डेबल ३२ जीबी अशी या फोनची मेमरी आहे. ८ मेगापिक्सेल फ्लॅशसह रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असून यात ९ ब्यूटी मोड्सची सुविधाही आहे. या फोनमध्ये एफएमची सुविधाही आहे. यासोबत फ्री स्क्रीन गार्डही मिळते.

वैशिष्टय़े :

  • डिस्प्ले : १२.७ सेमी एचडी आयपीएस डिस्प्ले
  • प्रोसेसर : १.३ गीगाहर्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसर
  • ऑपरेटिंग सिस्टम : ५.१ लॉलिपॉप
  • मेमरी : १ जीबी रॅम, ८ जीबी रॉम, एक्सपाण्डेबल ३२ जीबी
  • कॅमेरा : ८ मेगापिक्सेल रिअर फ्लॅशसह, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • बॅटरी : ५००० एमएएच
  • डायमेन्शन्स : १२७.३x६६x९.६५ मिमी
  • रंग : श्ॉम्पेन गोल्ड, सॅण्ड ब्लॅक
  • कनेक्टिव्हिटी : डय़ुअल सिम (थ्रीजी, टूजी)
  • कनेक्टिव्हिटी सेन्सर्स : जीएसम ८५०/९००/१८००/१९००/ एमएचझेड, युएमटीएस- ९००/ २१०० एमएचझेड, वायफाय ८०२, ११बी/जी/एन ब्लूटुथ ४.०, मायक्रो युएसबी २.०
  • सेन्सर्स : अ‍ॅक्सेलिरोमीटर, प्रॉक्झिमिटी, लाइट, इकॉम्पास
    प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com