28 January 2020

News Flash

बोसचे वायरलेस हेडफोन्स आणि साऊण्डस्पोर्ट हेडफोन्स

यासह बोसने साऊण्डस्पोर्ट हेडफोन्स आणि साऊण्डस्पोर्ट पल्स हेडफोन्सचीही घोषणा केली आहे.

बोसने वायरलेस क्वाइटकम्फर्ट ३५ आणि क्वाइटकंट्रोल ३० हे हेडफोन्स लाँच केले आहेत. हे दोन्ही वायरलेस हेडफोन्स सर्वार्थाने उत्तम अनुभव देतात. यासह बोसने साऊण्डस्पोर्ट हेडफोन्स आणि साऊण्डस्पोर्ट पल्स हेडफोन्सचीही घोषणा केली आहे.

बोस क्वाइटकम्फर्ट ३५ (क्यूसी ३५)
सध्या आपल्या आजूबाजूला प्रचंड आवाज असतो. अशा आवाजामध्ये क्वाइटकम्फर्ट ३५ हेडफोन्स उत्तम अनुभव देतात. त्यातही कस्टमाइज्ड ब्लूटूथमुळे कुठेही तुम्हाला चांगली कनेक्टिव्हिटी मिळू  शकते. दोन्ही कानांसाठी वेगवेगळ्या चिप्स असतात. या चिप्समुळे नको असलेला आवाज काही मिलीसेकंदांमध्ये नाहीसा होतो. गर्दीचा आवाज, सबवेमधल्या गाडीचा आवाज, विमानाच्या इंजिनाचा आवाज नाहीसा होऊन हवा असलेला आवाज सुस्पष्ट ऐकू येतो. इक्विलायझरमुळे आवाजातील बारकाव्यांनुसार संगीत व्यवस्थित ऐकू येतं. क्यूसी ३५ ची बॅटरी क्षमता २० तास इतकी आहे. न्यूयॉर्क ते हाँगकाँग या प्रवासाला लागणाऱ्या कालावधीपेक्षाही या बॅटरीची क्षमता जास्त आहे. या हेडफोनच्या उजव्या इअरकपवर ऑन/ऑफ, म्युझिक व्हॉल्यूम, प्ले/पॉझ आणि आन्सर/एण्ड कॉल्स अशी बटणं आहेत. क्यूसी ३५ गेल्या आठवडय़ापासून उपलब्ध झालं आहे. याची किंमत २९,३६३ इतकी आहे.

बोस क्वाइटकंट्रोल ३० (क्यूसी ३०)
आजच्या धावपळीच्या जगात सगळ्यांना सगळंच जमवून आणायचं असत. क्यूसी ३० हेडफोन तुमचा प्रत्येक दिवस उत्तम बनवतो. या हेडफोनचे नॉइस कॅन्सलेशन एखाद्या वायरलेस इअर डिझाइनसाठी अतिशय प्रगत आहे. यामध्ये त्यांनी दणकट अशी एक ब्लूटूथ सिस्टीम तयार केली आहे. ही सिस्टीम बदलत्या परिसरात विश्वसनीयरीत्या काम करू शकते. क्यूसी ३० हेडफोन्समध्ये अतिशय लहान इअरबर्ड्स असतात. हे इअरबर्ड्स एकूण सहा मायक्रोफोन्सना एकत्र ठेवतात. या हेडफोनचं नॉइस कॅन्सलेशन ऑन किंवा ऑफ न करता कमी-जास्त करा, ते गाण्यांचा आवाज कमी न करता तुम्ही ठरवलेल्या आवाजाच्या पातळीशी जुळवून घेईल. तुमच्या आवडत्या गाण्याचे किंवा गायक-गायिकेचे प्रत्येक शब्द, तान, हरकत ऐकण्यासाठी क्यूसी ३०ने ईक्यू ही नवीन सुविधा सुरू केली आहे. क्यूसी ३० ची बॅटरी क्षमता दहा तासांची आहे. या हेडफोनच्या इनलाइन रिमोटवर म्युझिक व्हॉल्यूम, प्ले/पॉझ, आन्सर/एण्ड कॉल्स आणि नॉइस कंट्रोल अशी बटणं आहेत. क्यूसी ३० सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. याची किंमत २६,४३८ इतकी आहे.

साऊण्डस्पोर्ट आणि साऊण्डस्पोर्ट पल्स हेडफोन्स
व्यायाम करताना हेडफोन्स वापरणं आता महत्त्वाचं झालंय, पण डिझाइन असलेल्या वायरलेस मॉडेल्समुळे कधीकधी दुखापत होते, ते कानात घट्ट बसत नाहीत, तर कधी कधी अशा हेडफोन्समुळे नीट ऐकूही येत नाही. साऊण्डस्पोर्ट हेडफोन्समुळे या सगळ्यावर मात करता येते. स्टेहिअर+टिप्सच्या विशेष स्पोर्ट व्हर्जनमुळे व्यायाम करताना सुरक्षित आणि आरामदायी वाटतं. मऊ आणि लवचीक सिलिकॉनपासून बनवलेल्या छत्रीसारख्या आकाराचे हे हेडफोन्स कानात एखाद्या सील लावल्यासारखं घट्ट बसतात. साऊण्डस्पोर्ट हेडफोनमध्ये इनलाइन माइकचीही सुविधा आहे. यामुळे गाणी बदलणे, आवाज कमी-जास्त करणे, फोन करणे किंवा उचलणे अशा गोष्टी करता येतात. एखाद्याचे चेस्ट स्ट्रॅप अचूकपणे मोजण्यासाठी साऊण्डस्पोर्ट पल्स हेडफोनमध्ये बिल्ट इन हार्ट रेट मॉनिटरही आहे. रनकीपर, एण्डोमोण्डो आणि इतर फिटनेस अ‍ॅपशी हे हेडफोन अनुरूप आहेत. साऊण्डस्पोर्ट पल्स हेडफोन्सची बॅटरी क्षमता पाच तास, तर साऊण्डस्पोर्ट हेडफोन्सची बॅटरी क्षमता तास तास इतकी आहे. साऊण्डस्पोर्ट हेडफोन्स गेल्या आठवडय़ापासून उपलब्ध असून त्याची किंमत १३,२७५ इतकी आहे, तर साऊण्डस्पोर्ट पल्स सप्टेंबरच्या सुरुवातीला उपलब्ध होईल. याची किंमत १७,६६३ इतकी आहे.

बोस कनेक्ट अ‍ॅप :
बोस कनेक्ट अ‍ॅपमुळे बोस वायरलेस हेडफोन्स अधिक कार्यक्षम होतात. युझर इंटरफेस (युआय) वापरताना कोणतीही अडचण येत नाही. तो अतिशय युझर फ्रेण्डली असल्यामुळे वापरकर्त्यांला ब्लूटूथ डिव्हाइस, सॉफ्टवेअर अपडेट्स, हवी असलेली भाषा पटकन बदलणं या गोष्टी पटापट आणि सहजपणे करता येतात. यामध्ये ब्लूटूथची सेटिंग केल्यानंतर ते वेगवेगळ्या डिव्हाइसना कनेक्ट होऊ शकते. तसंच सॉफ्टवेअर अपडेट आणि वैयक्तिक वापरासाठीच्या तरतूदी (पर्सनलाइज्ड) यात करता येतात. बोस कनेक्ट अ‍ॅपमध्ये क्वाइटकंट्रोल ३० साठी कंट्रोलेबल नॉइस कॅन्सलेशनची सुविधा आहे. यामुळे गोंगाट कमी करण्यास मदत होईल. साऊण्डस्पोर्ट पल्ससाठीच्या अ‍ॅपमध्ये तुमचा हार्टरेट कळेल.

उपलब्धता आणि रंग :
क्वाइटकम्फर्ट ३५ हेडफोन्स काळ्या आणि चंदेरी, तर क्वाइटकंट्रोल ३० हेडफोन्स काळ्या या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. साऊण्डस्पोर्ट वायरलेस हेडफोन्स काळ्या आणि अक्वा रंगात आता आणि सप्टेंबरमध्ये किट्रॉन रंगात मिळतो. साऊण्डस्पोर्ट पल्स हेडफोन्स पॉवर रेड रंगात उपलब्ध आहे. साऊण्डस्पोर्ट आणि क्वाइटकंट्रोल ३० हेडफोन्स या दोन्हींसाठी असलेले स्टेहिअर+टिप्स लहान, मध्यम आणि मोठे अशा तीन वेगवेगळ्या साइजेसमध्ये मिळतात.

लिनोवोचा वाइब के फाइव्ह
लिनोवोने नुकताच लाँच केलेला वाइब के फाइव्ह केचा डिस्प्ले १२.७ सेमी हाय डेफिनेशनचा आहे. ६४ बिट क्युअलकॉम ऑक्टा कोअर असा याचा प्रोसेसर आहे. ७२० ७ १२८० पिक्सेल रेझोल्युशन असलेला हा फोन ग्राहकाला उत्तम अनुभव देतो. फोनच्या १२.७ सेमी डिस्प्लेसह दोन उत्तम दर्जाचे स्टिरिओ स्पीकर्सही यात उपलब्ध आहेत. या स्पीकर्समुळे ग्राहकाला मल्टिमीडियाचा चांगला अनुभव घेता येतो. कमीत कमी कलकलाट आणि कोणतीही वॉइस क्लिप्स किंवा गाण लावलं असता त्यातून होणारा आवाजाचा विपर्यास हे टाळण्यासाठी स्पीकर्स डॉल्बी अ‍ॅटमॉसमुळे सक्षम आहेत. सुंदर डिस्प्ले आणि भरपूर मनोरंजन यामुळे ग्राहकांना यापूर्वी कधीही न मिळालेला अनुभव घेता येईल. याचा रिअर कॅमेरा १३ आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल इतका आहे. तुम्हाला हव्या त्या वेळी फोटो काढण्याचा आनंद वाइब के फाइव्ह देऊ शकतो. या फोनची किंमत ६९९९ इतकी असून तो सोनेरी, चंदेरी आणि करडय़ा रंगात उपलब्ध आहे.

फोर्थ जनरेशन मोटो जीचा सेल
फोर्थ जनरेशन मोटो जीचा फोन १२,४९९ रुपयांत अ‍ॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर  गेल्या आठवडय़ापासून उपलब्ध आहे. आजवरच्या मोटो जीच्या सगळ्या फोन्समधील हा फोन सगळ्यात सडपातळ म्हणजे ७.९ मिमी इतका आहे. ५.५ इंच, संपूर्ण एचडी असा या फोनचा डिस्प्ले आहे. याची बॅटरी ३००० एमएएच इतकी आहे. या फोनच्या १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेऱ्यातून क्रिस्टल क्लिअर फोटो येतात.

वैशिष्टय़े : 

 • ऑपरेटिंग सिस्टम : अ‍ॅण्ड्रॉइड ६.०.१ मार्शमॅलो.
 • प्रोसेसर : १.५ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोअर सीपीयू, अ‍ॅण्ड्रेना ४०५@५५० एमएचझेड जीपीयू क्युअलकॉम स्नॅपड्रॅगन ६१७ (एमएसएम८९५२) प्रोसेसर.
 • स्टोअरेज, मेमरी : स्टोअरेज- १६ जीबी, मेमरी (रॅम)-२ जीबी.
 • डायमेन्शन्स : उंची- १५३ मिमी, रुंदी- ७६.६ मिमी, खोली- ७.९-९.८ मिमी (कॅमेरा)
 • वजन : १५५ ग्रॅम.
 • डिस्प्ले : ५.५ इंच, टीएफटी एलसीडी, १०८० पी पूर्ण एचडी (१९२० x १०८० ), ४०१ पीपीआय, कॉर्निग गोरिला ग्लास थ्री
 • बॅटरी : ३००० एमएएच.
 • नेटवर्क्‍स : फोरजी एलटीई (कॅट फोर), यूएमटीएस/एचएसपीए + जीएसएम/ईडीजीई
 • बॅण्ड्स : जीएसएम/जीपीआरएस/ईडीजीई (८५०, ९००, १८००, १९०० एमएचझेड)
 • यूएमटीएस/एचएसपीए+ (८५०, ९००, २१०० एमएचझेड) फोरजी एलटीई (बी१, ३, ५, ८, ४०)
 • रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सेल ऋ/२.० अ‍ॅपर्चर, कलर बॅलन्सिंग डय़ुअल एलईडी फ्लॅश, प्रोफेशनल मोड, क्विक कॅप्चर, बेस्ट शॉट, कुठेही टॅप करून कॅप्चर करणं शक्य, ४ डिजीटल झुम, बर्स्ट मोड, ऑटो एचडीआर, पॅनारोमा, व्हिडीओ स्टॅबिलायझेशन, १०८० पी एचडी व्हिडीओ (३० एफपीएस), स्लो मोशन व्हिडिओ.
 • फ्रंट कॅमेरा : ५ मेगापिक्सेल, ऋ/२.२ अ‍ॅपर्चर, डिस्प्ले फ्लॅश, वाईड अँगल लेन्स.
 • सिम कार्ड : मायक्रो सिम, नॅनो सिम अ‍ॅडाप्टर उपलब्ध.
 • कनेक्टिव्हिटी : मायक्रो यूएसबी, ३.५ मिमी हेडसेट जॅक.
 • ब्लूटूथ टेक्नॉलॉजी : ब्लुटुथ व्हर्जन ४.१ एलई.
 • वाय फाय : ८०२.११ ं/ु/ॠ/ल्ल (२.४ आणि ५ गीगाहर्ट्झ)
 • स्पीकर्स : लाउडस्पीकर, दोन माइक
 • व्हिडीओ कॅप्चर : १०८०पी पूर्ण एचडी व्हिडीओ, ३० एफपीएस
 • लोकेशन सव्‍‌र्हिसेस : जीपीएस, एजीपीएस, जीएलओएनएएसएस
 • सेन्सर : अ‍ॅसिलिरोमीटर, जीरोस्कोप, अ‍ॅम्बिएंट लाइट सेन्सर, प्रॉझिमिटी सेन्सर, फिंगरप्रिंट रीडर (फक्त मोटो जी प्लसमध्ये)
 • रंग : काळा, पांढरा.

हॉनर फाइव्ह सी
हॉनर फाइव्ह सी या नव्या फोनमध्ये किरीन ६५०-१६एनएम प्रोसेसर आहे. संपूर्ण सेगमेंटमधील वेगवान असलेलं हे प्रोसेसर उत्तम अनुभव देतो. हा फोन सोनेरी, चंदेरी आणि करडा या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हॉनरने एक टॅबलेटही नुकताच लाँच केला आहे. हॉनर टी वन ७.० या नव्या टॅबलेटमध्ये ४१०० एमएएच इतकी बॅटरी आहे. यामध्ये प्रोफेशन फोटोग्राफी मोड्सही उपलब्ध आहेत. तुमचा फोन अधिक सुरक्षितत ठेवण्याच्या दृष्टीने यामध्ये फिंगर प्रिंट स्कॅनरही समाविष्ट आहे. तसंच मोहक मेटॅलिक डिझाइनमुळे हा फोन अधिक सुंदर दिसतो. या फोनमध्ये फिंगरप्रिंट आयडेंफिकेशनची २.० ही आवृत्ती असून याचा अनलॉकिंग स्पीड ०.५ सेकंद इतका आहे. १९२० x १०८० पिक्सेल, १६.७ मिलिअन कलर आणि पूर्ण एचडी आयपीएस असा या फोनचा डिस्प्ले आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेल तर फ्रंट कॅमेरा बीएसआय सेन्सरसह ८ मेगापिक्सेल इतका आहे. तसंच त्यात वेगवेगळे दहा ब्युटी मोड्सही आहेत. एअरक्राफ्ट ग्रेड अ‍ॅल्युनिअम अलॉय बॉडी असलेल्या  हॉनर फाइव्ह सीमध्ये अ‍ॅम्प्लिफायर पॉवर असलेले स्पीकर्स आणि बॉटम स्पीकर डिझाइनही आहे. अनेक सुविधा असलेला हॉनर फाइव्ह सी या फोनची किंमत १०,९९९ इतकी आहे. हॉनर टीवन ७.० हलक्या वजनाचा टॅबलेट आहे. या टॅबलेटची बॅटरी ४१०० एमएएच इतकी आहे. २० तासांचे थ्रीजी कॉलिंग आणि १२ तासांचा व्हिडीओचा अनुभव इतकी या टॅबलेटची क्षमता आहे. १०२४ x ६०० आयपीएस असा याचा डिस्प्ले असून त्यात मल्टीटच स्क्रीनही आहे. यात ए सेव्हन कोअर प्रोसेसरसह स्प्रेडट्रम एससी७७३१जी आहे.
response.lokprabha@expressindia.com

First Published on July 8, 2016 1:15 am

Web Title: new gadgets 3
Next Stories
1 मिझूचा एमथ्री एस नवा स्मार्टफोन
2 अ‍ॅससचे झेनव्होल्युशन २०१६
3 जिओनी एम फाइव्ह प्लस
Just Now!
X