28 January 2020

News Flash

एचटीसी डिझायर टेन सिरीजचे नवे फोन

एचटीसी डिझायर टेन लाइफस्टाइल विविध रंगांमध्ये लाँच होणार आहे.

एचटीसीच्या आगामी डिझायर टेन सिरीजच्या स्मार्टफोन्सच्या नव्या व्हिडीओची झलक ग्राहकांच्या भेटीस आली आहे. डिझायर टेन लाइफस्टाइल आणि डिझायर टेन प्रो हे दोन नवे स्मार्टफोन्स लवकरच बाजारात येतील. या दोन्ही फोन्समध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असून ते येत्या २० सप्टेंबरला लाँच होतील. नव्या व्हिडीओमध्ये #इीएॠ्रिी१ अशी टॅगलाइनही आहे. तसंच व्हिडीओमध्ये सुरुवातीलाच डिझायर टेन या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. एचटीसी डिझायर टेन लाइफस्टाइलचा डिस्प्ले ५.५ इंच एचडी (७२० ७ १२८० पिक्सेल्स) इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये क्युअलकॉम स्नॅपड्रॅगन क्वाड कोअर एसओसी हे प्रोसेसर आहे. हा फोन दोन वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये उपलब्ध होईल. एका आवृत्तीची मेमरी ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज इतकी आहे. तर दुसऱ्या आवृत्तीची मेमरी २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोअरेज इतकी आहे. अण्ड्रॉइड ६.० मार्शमॅलो ही या फोनची ऑपरेटिंग सिस्टम आहे. एचटीसी डिझायर टेन लाइफस्टाइलचा मागच्या बाजूचा कॅमेरा बीएसआय सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सेल इतका आहे. तर ५ मेगापिक्सेल असलेल्या पुढच्या कॅमेऱ्यामुळे १०८० पिक्सेल व्हिडीओ रेकॉर्डिग होऊ  शकतं. एचटीसी डिझायर टेन लाइफस्टाइल विविध रंगांमध्ये लाँच होणार आहे. तसंच या फोनमध्ये २४ बिट सिस्टम ऑडीओसह बुम साऊण्ड हाय-फाय एडीशन स्टिरीओ स्पीकर्सचा समावेश आहे.

पॅनासॉनिकची फेस्टिव्हल ऑफर

सणांच्या दिवसांत ग्राहकांचा आनंद, उत्साह द्विगुणीत करण्यासाठी पॅनासॉनिकने ‘द ग्रेट कपल ऑफर’ची घोषणा केली आहे. दसरा-दिवाळी या सणांच्या दिवसांत पॅनासॉनिकच्या टी सिरीजच्या स्मार्टफोन्सची खरेदी करणाऱ्या जोडप्यांसाठी ही खास ऑफर आहे. पॅनासॉनिकच्या टी सिरीजमधल्या टी ५०, टी ४४, टी ४४ लाइट आणि टी ३० या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर ही ऑफर आहे. द ग्रेट कपल ऑफरमध्ये ग्राहकांना पॅनासॉनिककडून इतरही भेटवस्तू मिळणार आहे. या ऑफरसह ग्राहकांना तीन पर्याय दिले जातील. दोन सिनेमांची तिकिटं, दोन कॉफी किंवा दोन पिझ्झा यापैकी ग्राहकांना एक पर्याय निवडावा लागेल. तसंच ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंगवर सवलत मिळेल. ही ऑफर १० सप्टेंबर ते १० नोव्हेंबपर्यंत देशभरातील मोबाइलच्या विविध स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

First Published on September 23, 2016 1:28 am

Web Title: new gadgets 4
Next Stories
1 पॅनासॉनिकचा एलुगा नोट
2 बोसचे वायरलेस हेडफोन्स आणि साऊण्डस्पोर्ट हेडफोन्स
3 मिझूचा एमथ्री एस नवा स्मार्टफोन
Just Now!
X