28 January 2020

News Flash

पॅनासॉनिक पी७७

७.६ मिमी इतका बारीक असलेला हा फोन ६,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

पॅनासॉनिकने नुकताच पी७७ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. केवळ १२६ ग्रॅम इतक्या वजनाचा आणि ७.६ मिमी इतका बारीक असलेला हा फोन ६,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पॅनासॉनिकच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये फोरजी आणि व्हीओएलटीईच्या कनेक्टिव्हिटीचाही समावेश आहे.

वैशिष्टय़े :

डिस्प्ले साइज, टाइप आणि रेझोल्यूशन : १२.७ सेमी एचडी लॅमिनेटेड आयपीएस

प्रोसेसर : १ गीगाहर्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसर

ऑपरेटिंग सिस्टम : अ‍ॅण्ड्रॉइड ५.१ लॉलिपॉप

मेमरी : १ जीबी रॅम आणि ८ जीबी रॉम आणि एक्सपांडेबल मेमरी ३२ जीबी.

मागील बाजूचा कॅमेरा : एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सेल

पुढील बाजूचा कॅमेरा : २ मेगापिक्सेल

बॅटरी : २००० एमएएच लिथिअम पॉलिमर बॅटरी

डायमेन्शन्स : १४३ ७ ७२  ७ ७.६ मिमी

उपलब्ध रंग : पांढरा, करडा

कनेक्टिव्हिटी : डय़ुअल सिम (फोरजी, थ्रीजी, टूजी) व्हीओएलटीई

कनेक्टिव्हिटी आणि सेन्सर :

जीसीएम-८५०/९००/१८००/१९०० यूएमटीएस – ९००/२१०० एलटीई- बी३/बी५/बी४०

८०२.११ बी/जी/एन, वायफाय हॉटस्पॉट आणि वायफाय डायरेक्ट

ब्लूटूथ ४.० आणि मायक्रो यूएसबी २.०

लाइट सेन्सर, प्रॉक्झिमिटी सेन्सर, अ‍ॅक्सेलेरोमीटर

ग्लोबल पोझिशनिंग सपोर्ट : ए-जीपीएस सपोर्ट, एफएम सपोर्ट

इनबॉक्स अ‍ॅक्सेसरीज : बॅटरी, स्क्रीनगार्ड, यूएसबी केबल, चार्जर, इअरफोन्स, वॉरंटी कार्ड, युझर मॅन्युअल, सिम इन्सर्ट पिन.

जाब्राचे नवे हेडफोन्स

मोबाइलमध्ये म्युझिक आणि फोन कॉल्सचा आवाज या दोन्हीचा अनुभव कोणत्याही व्यत्ययाविना आणि उत्तम येण्यासाठी जाब्राने नव्या हेडफोन्सची निर्मिती केली आहे. जाब्राचे हॅलो स्मार्ट हेडफोन्स उत्तम दर्जाचा अनुभव देतात. तसंच या हेडफोन्सच्या बॅटरीची क्षमता २३०एमएएच इतकी आहे. हे हेडफोन्स एकदा चार्ज केले की १७ तास फोनवर बोलता येतं आणि १५ तास म्युझिक ऐकता येतं. फक्त एका चार्जमध्ये हे हेडफोन्स उत्तम सुविधा देतात. ७९ टक्के वापरकर्त्यांना फोन कॉल्स आणि म्युझिकसाठी हेडफोनचा एकच सेट हवा असतो. पण अनेकदा म्युझिक ऐकण्यासाठी वापरण्यात येणारे हेडफोन्स फोन कॉल्ससाठी चांगला अनुभव देत नाहीत. जाब्रा हॅलो स्मार्टमध्ये उत्तम दर्जाचे मायक्रोफोन्स आहेत. त्यात फोन कॉल्सची गुणवत्ता वाढावी यासाठी नॉइज प्रोटेक्शन आहे. तसंच त्यात वायब्रेशन अलर्टचीही सुविधा आहे. गाणी ऐकत असताना कॉल आला तर ते कळावं यासाठी ही सुविधा केली आहे. १० मिमी स्पीकर्स आणि जाब्राची ध्वनी क्षमता यांमुळे आवाजाच्या दर्जात वापरकर्त्यांना कुठेही तडजोड करावी लागणार नाही. हे नवे हेडफोन्स वापरण्यास सुसह्य़ जावे म्हणून ते नेक बॅण्ड म्हणजे गळ्यात घालता येतील असे आहेत. तसंच फोन कॉल्स, म्युझिक आणि मीडिया यात अधेमधे निवडता यावे म्हणून तसे स्वीचही आहेत. या हेडफोनच्या बटणामुळे ग्राहक Siri™  किंवा Google Now™ सुद्धा वापरू शकतात. जाब्रा हॅलो स्मार्ट हेडफोन लाल, इलेक्ट्रिक निळा आणि काळा या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. किंमत रु. ३,४९९/-
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

First Published on September 30, 2016 1:19 am

Web Title: new gadgets 5
Next Stories
1 एचटीसी डिझायर टेन सिरीजचे नवे फोन
2 पॅनासॉनिकचा एलुगा नोट
3 बोसचे वायरलेस हेडफोन्स आणि साऊण्डस्पोर्ट हेडफोन्स
Just Now!
X