इंटेक्सने अ‍ॅक्वा लायन्स थ्रीजीसह लायन्स सीरिजचा स्मार्टफोन नुकताच बाजारात आणला आहे. आयपीएलप्रेमी आणि तरुणाईसाठी खास आकर्षण ठरलेला अ‍ॅक्वा लायन्स थ्रीजी स्मार्टफोन बाजारात ४,९९९ इतक्या किमतीत उपलब्ध आहे. अ‍ॅक्वा लायन्स थ्रीजी स्मार्टफोनचा डिस्प्ले ५ इंच एचडी आईपीएस इतका आहे. हा डिस्प्ले १६.७ दशलक्ष रंग रिप्रोडय़ूस करतो. यामुळे या स्मार्टफोनमध्ये घेतलेल्या फोटो आणि व्हिडीओजमध्ये जिवंतपणा येतो. या स्मार्टफोनचं वजन १७२ ग्रॅम असून त्याच्या स्लीक डिझाइनमुळे त्याचा लुक आकर्षक वाटतो. १ जीबी रॅम आणि १.२ गिगाहर्ट्जच्या क्वाड कोर प्रोसेसरमुळे हा स्मार्टफोन एका वेळी अनेक कामे करत उत्तम परफॉर्मन्स देतो. अ‍ॅण्ड्रॉइड लॉलिपॉप ५.१ या व्हर्जनमध्ये हा स्मार्टफोन कार्यरत असतो. या फोनमध्ये ३५०० एमएएच इतकी मोठी बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी वीस दिवस स्टँडबाय राहू शकते. तसेच त्यात ६ ते ८ तासांचा टॉकटाइमही समाविष्ट आहे. मोठी बॅटरी ‘बॅटरी सेव्हर मोड’मध्ये चार्ज होत असून तिची क्षमता ५० टक्क्य़ांपर्यंत वाढते.
वैशिष्टय़े:
अ‍ॅण्ड्रॉइड लॉलिपॉप ५.१, डिस्प्ले ५ इंच एचडी, रेझोल्यूशन १२८० प् ७२०, थ्रीजी नेटवर्क, १.२ गिगाहर्ट्ज क्वाड कोर, डायमेन्शन्स, १४५ प् ७१-५ प् ९.५ एमएम, वजन- १७२ ग्रॅम (बॅटरीसह), कॅमेरा- ५ मेगापिक्सल रिअर, २ मेगापिक्सेल फ्रंट, रॅम- १ जीबी, रॉम – ८ जीबी, एक्सपांडेबल – ३२ जीबी, बॅटरी- ३५०० एमएएच लि-पॉली

‘मेड फॉर इंडिया’ सुपरफोन ले वन एस इको

ले इको या कंपनीने ले वन एस इको हा इकोसिस्टम कटेंटसह असलेला पहिलाच फोन लाँच केला. ले वनएस इको हा पहिला ‘मेड फॉर इंडिया’ सुपरफोन असून त्यामध्ये एकात्मिक (अंतर्भूत) कंटेंट इकोसिस्टम आहे. नव्या फोनमधील या सिस्टममध्ये ले व्हीडीच्या माध्यमातून दोन हजारांहून अधिक मुव्ही टायटल्स आणि लाइव्हच्या माध्यमातून शंभराहून अधिक टीव्ही चॅनल्स तसेच ले इको म्युझिकच्या माध्यमातून २.५ दशलक्ष ट्रॅक्स उपलब्ध होणार आहे. एकसंध मनोरंजनाचा अनुभव घेण्यासाठी ले वन एस इकोमध्ये हेलिओ एक्स १० मीडिया टेक प्रोसेसर, १.८ जीएचझेड यांचा समावेश आहे. तसंच ३ जीबी रॅम असल्याने एकसंध व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि मल्टी टास्किंग करणे शक्य आहे. या सगळ्या सोयींमुळे अनोखा मल्टिमीडियाचा अनुभव मिळतो. ५.५ इंच (४०३ पीपीआय) स्क्रीन, १९२० ७ १०८० रेझोल्यूशन डिस्प्लेमुळे मोठय़ा आणि स्वच्छ स्क्रीनचा आनंद घेता येतो. १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असल्याने इमेज आणि व्हिडीओ अधिक सुंदर येतात. या फोनची बॅटरी ३००० एमएएच लिथिअम पॉलिमर बॅटरी असल्याने त्याचा अधिक ऑन द गो वापर करणे शक्य आहे.

ले इकोतर्फे मेंबरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून मनोरंजनाचा कन्टेंट इकोसिस्टम हा नवीन विभागही सुरू केला आहे. या सिस्टममधील लाइव्ह, ले व्हीडी आणि ले इको म्युझिक या तीन माध्यमांतून ग्राहकांना मनोरंजनाचा आनंद घेता येईल. लाइव्ह या माध्यमात संगीत, सिनेमे, बातम्या, नाटक, अध्यात्म, किड्स अशा विविध चॅनल्सचा समावेश आहे. तसेच ग्राहकांना यासंबंधीची चॅनल्स हिंदी, इंग्लिश, मराठी, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, मल्याळम, ओरिया या भाषांत बघण्याची संधी मिळेल. ले व्हीडीमुळे २००० हून अधिक टायटल्स हिंदी, इंग्लिश, मराठी, तमिळ, तेलुगु, पंजाबी, गुजराती, कन्नड, मल्याळम, बंगाली या भाषांमध्ये उपलब्ध होईल. सध्याच्या ले इको स्मार्टफोन वापरकर्त्यांना ही सेवा ओटीए (ओव्हर द एअर) पद्धतीने या मे महिन्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हंगामाबरोबर ले इको म्युझिक ही सुविधा उपलब्ध आहे. हंगामातर्फे ३.५ दशलक्षाहून अधिक म्युझिक ट्रॅक्सची निवड केली असून यामध्ये २५ भारतीय भाषांचा समावेश आहे. वापरकर्ते पर्सनलाइज्ड प्ले लिस्टच्या माध्यमातून त्यांच्या आवडीची गाणी टॉपवर आणून रेकमेंड करू शकतात. ही सुविधा २०१६च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होईल.

ले इकोच्या कन्टेंटइकोसिस्टममुळे एंटरटेन्मेंट सुपर होत असल्यामुळे ले इकोतर्फे सुपटेन्मेंट पॅकेजही सुरू करण्यात आले आहे. या पॅकेजची सुरुवात १०,८९९/- पासून झाली असून यात ले वन एस इको ९,९९९/-, एका वर्षांची कन्टेंट मेंबरशिप ४९००/- आणि ले इको ऑफर ४०००/- यांचा समावेश आहे. पहिल्या फ्लॅश सेलची सुरुवात १२ मेला दुपारी दोन वाजल्यापासून होणार असून सुपरटेन्मेंट पॅकेज ९९९९/- या आकर्षक किमतीत उपलब्ध होणार आहे. महिन्याला ४९० तर वर्षांला ४९०० इतक्या किमतीत कन्टेंट मेंबरशिप सुरू करण्यात येत आहे. वर्षांची कन्टेंट मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना हार्डवेअर प्राइस डिडक्शन म्हणून ४०००/- इतकी सूट मिळेल.

पॅनासॉनिकचा फोरजी व्होल्ट फॅब्लेट एलुगा आय थ्री

पॅनासॉनिक कंपनीने नुकताच एलुगा आय थ्री हा फोन लाँच केला आहे. हा नवा फोन भारतीय ग्राहकांसाठी नव्या फोरजी व्होल्टसह फॅब्लेट कॅटगरीत उपलब्ध आहे. १३.९७ सेंमी (५.५ इंच) एचडी आयपीएस डिस्प्ले असल्यामुळे एलुगा आय थ्रीची स्क्रीन वेगवेगळ्या अँगल्सने सहज बघता येते. तसेच दिवसा कितीही उजेडात त्यावरील विविध गोष्टी वाचता येतात. या फोनमध्ये फोरजी व्होल्ट उपलब्ध आहे. भरपूर डेटा आणि आवाजाचा उत्तम दर्जा अनुभवता येतो. शिवाय  यामध्ये इंडिया स्पेसिफिट एलटीईचे ३,५ आणि ४० हे बॅण्ड्स आहेत. मेगापिक्सेल फ्रंट, तर एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. या फोनची किंमत ९२९० इतकी आहे. २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल मेमरी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवण्याची क्षमता या फोनमध्ये आहे.

वैशिष्टय़े:

मॉडेल नाव : पॅनासॉनिक एलुगा आय थ्री, डिस्प्ले साइज, टाइप आणि रेझोल्यूशन : १३.९७ सेंमी (५.५ इंच) एचडी आयपीएस डिस्प्ले, प्रोसेसर : १.३ गिगाहर्ट्ज क्वाड कोर प्रोसेसर, ऑपरेटिंग सिस्टम : अ‍ॅण्ड्रॉइड ५.१ (लॉलिपॉप), मेमरी : २ जीबी रॅम, १६ जीबी रॉम, एक्स्पांडेल ३२ जीबी, कॅमेरा : १३ मेगापिक्सेल एफ रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, बॅटरी : २७०० एमएएच, डायमेन्शन्स : १५१ एमएम प् ७७ एमएम प् ८.२ एमएम, उपलब्ध रंग : श्ॉम्पेन गोल्ड, रोझ गोल्ड, मरीन ब्ल्यू., कनेक्टिव्हिटी : डय़ुअल सिम (फोर जी/थ्रीजी + टूजी), कनेक्टिव्हिटी अ‍ॅण्ड सेन्सर्स : जीएसएम-८५०/९००/१८००/१९०० यूएमटीएस- ९००/२१०० एलटीई-बीथ्री/बीफाइव्ह/बीफोर्टी ८०२.११ बी/जी/एन; वायफाय हॉटस्पॉट अ‍ॅण्ड वायफाय डायरेक्ट, ब्लुटुथ ४.०, मायक्रो यूएसबी २.०, लाइट सेन्सर, प्रॉक्झिमिटी सेन्सर अ‍ॅण्ड अ‍ॅक्सलेरोमीटर (Accelerometer), ग्लोबल पोझिशनिंग सपोर्ट : होय. ए-जीपीएस सपोर्टसह, एफएम सपोर्ट : होय.
इनबॉक्स अ‍ॅक्सेसरीज :
डिव्हाइज इनक्युझिव्ह ऑफ बॅटरी, यूएसबी केबल, चार्जर, इअरफोन्स, वॉरंटी कार्ड, यूझर मॅन्युअल, सिम रिमूव्हल टुल, प्रोटेक्टिव्ह स्क्रीन गार्ड.