13 August 2020

News Flash

पॅनासॉनिकचा एलुगा नोट

पॅनासॉनिकने तरुणाईला लक्षात घेऊन नुकताच एलुगा नोट हा फॅबलेट लाँच केला आहे.

पॅनासॉनिकने तरुणाईला लक्षात घेऊन नुकताच एलुगा नोट हा फॅबलेट लाँच केला आहे. यामध्ये अनेक वैशिष्टय़पूर्ण सुविधा आहेत. या सुविधांमुळे इलुगा नोट हा फॅबलेट हा ग्राहकांना वापरताना सोयीचा ठरतो. तसंच त्याच्या परफॉर्मन्समुळे समाधानही देतो. दैनंदिन जीवनातील आवश्यक गरजांसाठी हा फॅबलेट अतिशय उपयुक्त आहे. याची किंमत १३,२९०/- इतकी आहे.

वैशिष्टय़े :

 • ऑपरेटिंग सिस्टम : अ‍ॅण्ड्रॉइड ६.० मार्शमॅलो फिटहोम यूआयसह
 • वजन : १४२ ग्रॅम
 • प्रॉडक्ट डायमेन्शन्स : १४६ x ७४.५ x ८.१५ मिमी
 • डिस्प्ले आणि रेझोल्युशन : ५.५ (१३.९७ सेमी) आयपीएस एलटी
 • प्रोसेसर : १.३ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोअर
 • मेमरी : ३ जीबी रॅम / ३२ जीबी इंटर्नल. ३२ जीबीपर्यंत अपग्रेडेबल
 • बॅटरी : ३००० एमएएच ली पॉलिमेअर
 • कॅमेरा : ट्रिपल एलईडी फ्लॅश, एफ १.९ अ‍ॅपर्चर, ६ पी लेन्ससह १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा.
 • वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीस : ब्लुटुथ ४.०, वायफाय हॉटस्पॉट, वायफाय डायरेक्ट, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (ए-जीपीएस), आरडीएससह एफएम.
 • इन्फ्रार्ड ब्लास्टर : हो
 • सेन्सर्स : अ‍ॅम्बिएण्ट लाइट सेन्सर, अ‍ॅक्सिलेरोमीटर, प्रॉक्झिमिटी सेन्सर
 • कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजीज : व्हीओएलटीई सपोर्टसह जीएसएम ८५०/९००/१८००/१९०० एमएचझेड, यूएमटीएस ९००/२१०० एमएचझेड, एलटीई (बॅण्ड ३/५/४०)
 • आकर्षक वैशिष्टय़ : अ‍ॅप्ससाठी थंब अ‍ॅक्सेससह फिटहोम युझर इंटरफेस, मोबाइल अ‍ॅण्टी थेफ्ट, डबल टॅप लॉक, स्मार्ट अ‍ॅप मॅनेजर अ‍ॅप्लिकेशन, आयआरवर आधारित होम अप्लायन्सेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट रिमोट कंट्रोल अ‍ॅपसह आयआर सेन्सर.
 • फॉर्म फॅक्टर आणि डिझाइन : रिमूव्हेबल बॅक कव्हरसह टेक्स्चर्ड बॅक डिझाइन
 • रंग :  श्ॉम्पेन गोल्ड

लेनोवो वाइब के फोर नोटची वूडन एडिशन

लेनोवोचा सर्वात जास्त विकला जाणारा वाइब के फोर नोट आता प्रीमियम वूडन या नव्या कोऱ्या एडिशनमध्ये उपलब्ध झाला आहे. याची किंमत ११,४९९/- इतकी असून तो अ‍ॅमझॉन या साइटवर उपलब्ध आहे. या फोनचा डिस्प्ले व्हायब्रंट ५.५ इंच संपूर्ण एचडी असा आहे. १७८ डिग्री वाईड अँगल आणि १०८० p क्लॅरिटी (178 degree wide viewing angle and 1080p clarity), यासह अनुकूल रंगसंगती आणि उच्च दर्जाचे तंत्रज्ञान यामुळे हा मोबाइल वापरकर्त्यांना व्हिडीओ बघण्याचा अतिशय उत्तम अनुभव येतो. पहिल्यांदाच वाइब के फोर नोटमध्ये पुढील बाजूस डॉल्बी अ‍ॅटमॉसचे दोन पोर्टेड स्टीरिओ स्पीकर्स बसवले आहेत. या नव्या तंत्रज्ञानामुळे गाणी ऐकताना किंवा व्हिडीओ बघताना आवाजातील इतरत्र अडथळा कमी होतो. यामध्ये १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा तर ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. क्रिएटिव्ही कण्टेण्ट प्रोडय़ुसरसाठी के फोर नोट हा अत्यंत आदर्श फोन आहे. अ‍ॅण्ड्रॉइड ६.० मार्शमॅलो ही या फोनची ऑपरेटिंग सिस्टम आहे. यात ३३०० एमएएच इतकी बॅटरी आहे तर ६४ बीट मीडिया टेक ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे. ३ जीबी रॅम असलेल्या या फोनचा अनुभव अतिशय चांगला आहे. गेम्स खेळताना, मल्टिमीडियाचा वापर करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. यूएसबी ओटीजी सपोर्टसह १६ जीबी इंटर्नल स्टोअरेज आहे. यात फिंगरप्रिंट आणि एनएफसी सेन्सर अशी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत. थिएटरमॅक्स टेक्नॉलॉजी असलेला के फोर नोट हा पहिला फोन आहे. या फोनचे आजवर ७ लाख ५० हजार इतके युनिट्स विकले गेले आहेत.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2016 1:18 am

Web Title: new gadgets in market 2016
Next Stories
1 बोसचे वायरलेस हेडफोन्स आणि साऊण्डस्पोर्ट हेडफोन्स
2 मिझूचा एमथ्री एस नवा स्मार्टफोन
3 अ‍ॅससचे झेनव्होल्युशन २०१६
Just Now!
X