15 August 2020

News Flash

लेनोवोचे नवे लॅपटॉप्स

आयडियापॅड ७१० एस आणि ५१० एस हा लॅपटॉप अतिशय बारीक असून तो लगेच चार्ज होतो.

सातव्या जनरेशनचे इंटेल प्रोसेसर, पूर्ण एचडी डिस्प्ले, क्विक चार्ज आणि उत्तम ग्राफिक्स क्षमता या सुविधा असलेले लेनोवोचे नवे लॅपटॉप्स बाजारात आले आहेत.

आयडियापॅड ७१० एस आणि ५१० एस
हा लॅपटॉप अतिशय बारीक असून तो लगेच चार्ज होतो. हा लॅपटॉप विंडोज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. लॅपटॉपवर सतत काम करणारे ग्राहक कमी वजनाच्या लॅपटॉपच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी आयडियापॅड ७१० एस हा लॅपटॉप फायदेशीर आहे. यामध्ये १३.३ इंचाच्या एचडी आयपीएस पॅनलला आकर्षक मेटल फ्रेममध्ये बसवलं आहे. ही मेटल फ्रेम अ‍ॅल्युमिनिअम आणि मॅग्निजिअमने बनवण्यात आली आहे. या फ्रेममुळे लॅपटॉप बारीक आणि हलका होण्यास मदत होते. सध्याच्या वेगवान जगात लॅपटॉप वापरकर्त्यांच्या अपेक्षा, मागण्या पूर्ण करण्यासाठी आयडियापॅड ७१० एस या लॅपटॉपमध्ये हाय स्पीड पीसीआयई सॉलिड स्टेट ड्राइव्ह आणि क्विक चार्जिगची सुविधा आहे. आयडियापॅड ५१० हा लॅपटॉपही बारीक असून यातही त्वरित चार्ज होण्याची सुविधा आहे. सतत प्रवास करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हर्मन कार्डन ऑडिओची मनोरंजनात्मक सुविधाही त्यात आहे.

आयडियापॅड वाय ७००; ४३.९ सेंटिमीटर
गेमिंग पीसीच्या वाढत्या मागणीनुसार लेनोवोने मोठी स्क्रीन असलेला आयडियापॅड ७०० बाजारात आणला. हा लॅपटॉप वापरकर्त्यांना रंजक व्हिज्युअल्स आणि आवाजाचा उत्तम अनुभव देतो. यामध्ये क्वाडकोर प्रोसेसर, डिस्क्रिट ग्राफिक्स आणि एक संपूर्ण मल्टिमीडिया आहे.

आयडियापॅड ३१० आणि ५१०
डॉल्बी ऑडिओ आणि हर्मन कार्डन या सुविधांमुळे हा एक मीडिया पॉवरहाऊसच आहे. आयडियापॅड ३१० खरं तर एक मल्टिमीडिया चॅम्पिअन आहे. यामध्ये डॉल्बी ऑडिओच्या सुविधेमुळे होम थिएटरच्या दर्जाच्या आवाजाचा अनुभव मिळतो. आयडिया ३१० हा लॅपटॉप काळा, लाल, रुपेरी, पर्पल या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हर्मन कार्डन ऑडिओ इक्विपमेंट असलेला आयडियापॅड ५१० हा पहिला लॅपटॉप आहे. यामध्ये सातव्या जनरेशनचे इंटेल सीपीयू प्रोसेसर, आयपीएस पॅनल, एफएचडी डिस्प्ले आणि ४ जीबी एनवीडिया डिस्क्रीट ग्राफिक्स आहेत.

मिक्स ३१०- टू इन वन डिटॅचेबल
५८० ग्रॅम वजनाच्या मिक्स ३१० मध्ये वैकल्पिक फोरजी एलटीई आहे. कुठूनही काम करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा लॅपटॉप अतिशय उपयुक्त आहे. हा लॅपटॉप १० तासांची बॅटरी लाइफ देत असून त्यात फुल एचडी डिस्प्ले आहे.

योगा ५१०
वेगाने चार्ज होण्याची क्षमता आणि वजनाने हलका ही योगा ५१० ची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. स्टायलिश डिझाइन आणि वजनाने हलका असा योगा ५१० जलद चार्जिगच्या क्षमतेचा आहे.

अ‍ॅससचा झेनफोन थ्री डिलक्स
अ‍ॅससचा झेनफोन थ्री डिलक्स नुकताच लाँच झाला. या फोनमध्ये क्युअलकॉम स्नॅपड्रॅगन ८२१ या नव्या सिस्टमचा समावेश आहे. या फोनची किंमत ५२,०००/- इतकी आहे. झेनफोन थ्री डिलक्स व्हेरिअण्टमध्ये स्नॅपड्रॅगन ८२० चा समावेश आहे. झेनफोन थ्री डिलक्सचा डिस्प्ले सुपर अ‍ॅमॉल्ड ५.७ इंच पूर्ण एचडी असा आहे. या फोनची मेमरी ६ जीबी रॅम असून मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून एक्स्पाण्डेबल १२८ जीबी इतकी आहे. रिअर कॅमेरा २३ मेगापिक्सेल तर  फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेल इतका आहे. झेनफोन थ्री डिलक्सची बॅटरी ३००० एमएएच इतकी आहे. या फोनचे डायमेन्शन्स १५६.४ ७ ७७.४ ७ ७.५ मिमी असून त्याची ऑपरेटिंग सिस्टम अ‍ॅण्ड्रॉइड ६.० मार्शमॅलो ही आहे. झेनफोन थ्री डिलक्स व्हेरिअण्टमध्ये ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज आहे. या फोनसह अ‍ॅससने झेनपॅड थ्री एस टेन (झेड ५०० एम) हा टॅबलेटही लाँच केला आहे. ९.७ इंच एलसीडी असा याचा डिस्प्ले आहे. तसंच याच्या स्क्रीनचं रेझोल्युशन २०४८ ७ १५३६ पिक्सेल असे आहे. या टॅबलेटमध्ये ४ जीबी रॅम आहे आणि ३२ जीबी मेमरी आहे. याचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल इतका आहे. अ‍ॅण्ड्रॉइड ६.० मार्शमॅलो ही या टॅबलेटची ऑपरेटिंग सिस्टम आहे. टॅबलेटमध्ये १.७ गीगाहर्ट्झ हेक्सा कोअर मीडिया टेक (एमटी ८१७६) प्रोसेसर आहे. याची किंमत २३,०००/- इतकी आहे आणि हा टॅबलेट या महिन्यात खरेदीसाठी उपलब्ध होईल.

गेम्स, ऑटो कॉल रेकॉर्ड असलेला फोन
गेल्या महिन्यात झेन कंपनीचा झेन सिनेमॅक्स टू प्लस हा मोबाइल फोन बाजारात उपलब्ध झाला. शॉपक्ल्यू या साइटवर या फोनची किंमत ३,७७७ इतकी आहे. सिनेमॅक्स टू प्लस या फोनच्या बॅटरीमध्ये नऊ तासांचा टॉक टाइम आणि २०० तासांचा स्टॅण्डबाय टाइम इतकी क्षमता आहे. ५ मेगापिक्सेल मागचा कॅमेरा आणि ३.२ पुढचा कॅमेरा यांमुळे उत्तम दर्जाचे फोटो येतात. तसंच या कॅमेऱ्यामुळे व्हिडीओ कॉलिंगचा उत्तम अनुभवही घेता येतो. या स्मार्ट फोनमध्ये गेम्स, ऑटो कॉल रेकॉर्ड, कॉन्टॅक्ट ब्लॅकलिस्ट आणि म्यूट फीचर्स आहेत.

वैशिष्टय़े :

स्क्रीन साइज : ५.५ इंच
डिस्प्ले : एफडब्ल्यूव्हीजीए आयपीएस स्क्रीन
प्रोसेसर : १.३ गीगाहर्ट्झ क्वाड कोअर
मेमरी : १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी, ३२ जीबी एक्सपाण्डेबल
ऑपरेटिंग सिस्टम : ५.१ लॉलिपॉप
कॅमेरा : ५ मेगापिक्सेल मागचा कॅमेरा (ऑटो फोकस) + ३.२ पुढचा कॅमेरा (फ्रंट फिक्स्ड फोकस)
बॅटरी : २९०० एमएएच
नेटवर्क : ३ जी डय़ुअल सिम सपोर्ट
मीडिया : म्युझिक प्लेअर, व्हिडीओ प्लेअर, एफएम रेडिओ
कनेक्टिव्हिटी : ब्लूटुथ, वायफाय
सेन्सर : प्रॉक्झिमिटी/जी सेन्सर
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2016 1:15 am

Web Title: new gadgets in market 2016 2
Next Stories
1 पॅनासॉनिक पी७७
2 एचटीसी डिझायर टेन सिरीजचे नवे फोन
3 पॅनासॉनिकचा एलुगा नोट
Just Now!
X