13 August 2020

News Flash

अ‍ॅससचे झेनव्होल्युशन २०१६

लेखन आणि चित्रकलेचे अतिशय उत्कृष्ट असे हे साधन आहे.

अ‍ॅसस या कंपनीने झेनव्होल्युशनअंतर्गत अनेकविध उपकरणं, सुविधा लाँच केल्या आहेत. झेन्बो, झेनफोन थ्री डिलक्स, झेनफोन थ्री, झेनफोन थ्री अल्ट्रा, झेनबुक थ्री, ट्रान्सफॉर्मर थ्री, ट्रान्सफॉर्मर थ्री प्रो, ट्रान्सफॉर्मर मिनी, अ‍ॅसस पेन, अ‍ॅसस ऑडिओ पॉड, अ‍ॅसस डिझायनो कव्‍‌र्ह एमएक्स३४व्हीक्यू, रॉग एक्सजी स्टेशन टू असे काही उपकरणं आणि सुविधांमुळे ग्राहकांना मोबाइल हाताळणं सोयीचं आणि फायद्याचं ठरणार आहे.

अ‍ॅसस ट्रान्सफॉर्मर थ्री प्रो

अ‍ॅसस ट्रान्सफॉर्मर थ्री प्रो अगदी ८.३५ मिमी बारीक असला तरी त्यात प्रचंड सामथ्र्य आणि कडकपणा आहे. अ‍ॅसस ट्रान्सफॉर्मर थ्री प्रोला असलेलं डायमंड कट डिटेलिंग त्याच्या मोहक डिझाइनवर अधिक भर देते. अ‍ॅसस ट्रान्सफॉर्मर थ्री प्रो आयसीकल गोल्ड आणि ग्लेशिअर ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. याचा १२.६ इंच सुंदर डिस्प्ले असून २८८० x १९२० इतकं रेझोल्युशन आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये इंटेल कोअर आय सेव्हन प्रोसेसर असून १६ जीबी २१३३ एमएचझेड रॅम आहे. सोयीस्कररित्या कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी ३.० आणि एचडीएमआय पोर्ट्स यात आहेत. १३ मेगापिक्सेल कॅमेऱ्यामुळे ग्राहकांना उत्तम दर्जाचे फोटो आणि व्हिडीओ काढता येतात. यासह अ‍ॅसस पेन हे साधनही उपलब्ध आहे. लेखन आणि चित्रकलेचे अतिशय उत्कृष्ट असे हे साधन आहे. या पेनमुळे लेखन आणि स्केचिंगमधील अचूकता अनुभवायला मिळते. ग्राहक ट्रान्सफॉर्मर थ्री प्रोच्या हाय रेझोल्युशन कॅमेऱ्याने फोटो काढून लगेच त्याविषयी काही लिहायचे असेल तर ते अ‍ॅसस पेनच्या साहाय्याने लिहू शकतात. ट्रान्सफॉर्मर थ्री प्रो यूएसबी-सी ३.१, यूएसबी ३.०, एचडीएमआय, व्हीजीए, आरजे४५, एलएएन आणि थ्री इन वन एसडी कार्ड रीडर असे कनेक्टिव्हिटी पोर्ट्स उपलब्ध करून देते. अ‍ॅसस ऑडिओ पॉड मनोरंजनाचं एक साधन आहे. यामध्ये प्रचंड सामथ्र्य असलेले चार स्पीकर्स आहेत.

अ‍ॅसस ट्रान्सफॉर्मर थ्री

केवळ ६९५ ग्रॅम वजन, ६.९ मिमी पातळ असा अ‍ॅसस ट्रान्सफॉर्मर थ्री ए फोर पेपरच्या डायमेन्शनपेक्षाही कमी डायमेन्शनचा आहे. ट्रान्सफॉर्मर थ्री आसीकल गोल्ड, ग्लेशिअर ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध आहे. याचा डिस्प्ले १२.६ इंच असून रेझोल्युशन २८८० x १९२० इतकं आहे. अ‍ॅसस ट्र टू लाइफ टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ट्रान्सफॉर्मर थ्री उत्तम व्हिडीओ परफॉर्मन्स देतो. यामध्ये सेव्हन्थ जेन इंटेल कोअर प्रोसेसर आहे. तसंच ५१२ जीबी एसएसडी आणि ८ जीबी रॅम आहे. अ‍ॅसस पेन, अ‍ॅसस युनिव्हर्सल डॉक, अ‍ॅसस ऑडिओ पॉड, आणि रॉग एक्सजी स्टेशन टू अशा अ‍ॅक्सेसरीज ट्रान्सफॉर्मर थ्रीमध्ये आहेत.

अ‍ॅसस ट्रान्सफॉर्मर मिनी

ट्रान्सफॉर्मर मिनी ८.२ मिमी इतका बारीक आहे. यामध्ये १०.१ इंच डिस्प्ले आणि टट्रूविविड डिस्प्ले टेक्नॉलॉजी आहे. टट्रूलाइफ व्हिडीओ टेक्नॉलॉजीमुळे व्हिडीओ परफॉर्मन्स उत्तम असतो. यूएसबी पोर्ट, ८०२.११ एसी वायफाय आणि ११ तासांची बॅटरी लाइफ या सुविधांनी ट्रान्सफॉर्मर मिनी सज्ज आहे.

झेनफोन थ्री

५.५ इंच एचडी (१९२० ७ १०८०), ५०० सीडी/ एमटू ब्राइटनेससह सुपर आयपीएस + डिस्प्ले असे वैशिष्टय़ असलेला झेनफोन थ्री नुकताच लाँच झाला. याचा रिअर कॅमेरा १६ मेगापिक्सेल इतका आहे. नवीन क्युअलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ ऑक्टाकोअर प्रोसेसर असलेला झेनफोन थ्री हा जगातला पहिला स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आहे. झेनफोन थ्रीमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

झेनफोन थ्री डिलक्स

झेनफोन थ्री डिलक्स हे झेनफोन थ्री फॅमिलीचं प्रमुख आणि अ‍ॅससच्या स्मार्टफोनच्या डिझाइनमधलं अंतिम मॉडेल आहे. झेनफोन थ्री डिलक्सची स्क्रीन ५.७ इंच एचडी (१९२० ७ १०८०) इतकी असून डिस्प्ले अ‍ॅलॉल्ड आहे. क्युअलकॉम स्नॅपड्रॅगन ८२० सीरिज असा या फोनचा प्रोसेसर असून ६ जीबी रॅम आहे. ६ जीबी रॅममुळे हवं असलेलं अ‍ॅप, गेम किंवा मीडिया यांच्याशी पटकन जोडलं जातं. झेनफोन थ्री डिलक्स त्याच्या २३ मेगापिक्सेल कॅमेऱ्यामुळे मोबाइल फोटोग्राफीचा दर्जा उंचावतो. यामध्ये सोनीचे आयएमएक्स ३१८ इमेज सेन्सर, लार्ज ऋ/२.० अपर्चर लेन्स आहे. तसंच फोटो काढताना फोन कसाही हलला तरी फोटो चांगलेच येतात. साधारणपणे फोटो काढताना फोन हलला तर फोटो ब्लर येतात. पण, या फोनमध्ये तसं होत नाही. ग्राहक हेडफोन्स लावून संगीत ऐकतील तेव्हा ते हाय रेझ ऑडिओचा आनंद उपभोगू शकतात. कारण हाय रेझ ऑडिओच्या आवाजाचा दर्जा सीडीच्या आवाजाच्या चौपट चांगला आहे.

झेनफोन थ्री अल्ट्रा

झेनफोन थ्री अल्ट्रा हा स्मार्टफोन मल्टिमीडियाप्रेमींसाठी डिझाइन केला आहे. ६.८ इंच एचडी (१९२० x १०८०) डिस्प्ले असा आहे. झेनफोन थ्री अल्ट्रा आवाजाच्या बाबतीतही उत्कृष्ट आहे. या फोनमध्ये दोन नवीन फाइव्ह मॅग्नेट स्टीरिओ स्पीकर आणि एनएक्सपी स्मार्ट अ‍ॅम्प्लिफायर आहेत. या नवीन सुविधेमुळे याचा आवाज अतिशय स्पष्ट आणि दणक्यात येतो. शिवाय ही सुविधा स्पीकर्सना नुकसानापासून वाचवते. झेनफोन थ्री डिलक्सप्रमाणेच झेनफोन थ्री अल्ट्रामध्येही २३ मेगापिक्सेल कॅमेरासह अ‍ॅसस ट्रायटेक ऑटोफोकस सिस्टम आहे. या फोनचा क्युअलकॉम स्नॅपड्रॅगन ६५२ ऑक्टाकोअर प्रोसेसर असून ४ जीबी रॅम आहे. या फोनच्या बॅटरीची क्षमता ४६०० एमएएच इतकी आहे.

झेनबुक थ्री

अल्ट्रा स्लीक ११.९ एमएम आणि फक्त ९१० ग्रॅम वजन असलेल्या झेनबुकमध्ये अनेक वैशिष्टय़े आहेत. एरोस्पेससाठी जे अ‍ॅल्युमिनिअम अलॉय वापरलं जातं तेच झेनबुक थ्रीसाठीही वापरलं जातं. रॉयल ब्ल्यू, रोझ गोल्ड, क्वार्ट्झ ग्रे या तीन रंगांमध्ये झेनबुक उपलब्ध आहे. यामध्ये इंटेल कोअर आय सेव्हन प्रोसेसर, १६ जीबी २१३३ एमएचझेड रॅम, नेक्स्ट जेन युएसबी टाइप सी पोर्ट आणि हर्मन कार्डनचे चांगल्या दर्जाचे क्वाड स्पीकरर आहे.कॉर्निग गोरिला ग्लास फोर असल्यामुळे स्क्रॅच रेझिस्टंट आहे.

अ‍ॅसस झेन्बो

हाताळण्यास सोपा, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला मदत करणारा, मनोरंजक असा घरासाठी उपयुक्त असा रोबोट म्हणजे झेन्बो. झेन्बोमध्ये विशिष्ट कार्यक्षमता आहेत. या कार्यक्षमतांमुळे घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या सुरक्षा, आरोग्य याकडे लक्ष ठेवण्यासाठी मदत होते. घरातील एखाद्या काळजीवाहू सदस्याप्रमाणे तो महत्त्वाच्या कामांबाबत आठवण करून देतो. डॉक्टरांकडे जाणे, औषध घेणे, व्यायाम करणे किंवा अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या कामांबाबत झेन्बो आठवण करून देतो. झेन्बो गमतीदार आणि लहानांसाठी त्यांचा शिक्षणातला दोस्तसुद्धा आहे. तो मुलांना गोष्टी सांगतो, शैक्षणिक खेळही खेळतो. यामुळे मुलांची सर्जनशीलता आणि तात्विकदृष्टय़ा वैचारिक शैली वाढीस लागते.

अ‍ॅसस डिझायनो कव्‍‌र्ह एमएक्स३४व्हीक्यू

डिझायनो कव्‍‌र्ह एमएक्स३४व्हीक्यू हा ३४ इंच, अल्ट्रा वाईट यूडब्ल्यूक्यूएचडी (३४४० x १४४०) असा आहे. डिझायनोमध्ये सॉनिक मास्टर ऑडिओ आहे. ही सिस्टम हर्मन कार्डन अ‍ॅकॉस्टिक टेक्नॉलॉजीला एकत्रित करते. तसंच त्यात आठ व्ॉट असलेले दोन स्टिरिओ स्पीकर्स आहेत. या स्पीकर्समुळे आवाजाचा दर्जा उंचावतो.

रॉग एक्सजी स्टेशन टू

रॉग एक्सजी स्टेशन टू हे बाह्य़ ग्राफिक्स कार्ड डॉक आहे. यामुळे लॅपटॉप व्हीआर गेमिंग पॉवर हाऊससारखा सुरू होतो. थंडरबोल्ट तीन आणि प्रॉप्रिअटरी कनेक्टर या सुविधांनी रॉग एक्सजी स्टेशन टू सज्ज आहे. प्रॉपिअटरी कनेक्टरमुळे १५ टक्क्यांनी परफॉर्मन्स सुधारतो.
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2016 1:17 am

Web Title: new gadgets of 2016
Next Stories
1 जिओनी एम फाइव्ह प्लस
2 मिझूचा एम थ्री नोट
3 लेनोवोचा झेडयूके झेड वन
Just Now!
X