Leading International Marathi News Daily
शनिवार ४ एप्रिल २००९

उपनिबंधक कार्यालयाची टाळाटाळ
आम्ही राहत असलेल्या श्रीसाईप्रसाद हाऊसिंग सोसायटीच्या कामामध्ये (Addition and Alteration) फार मोठी आर्थिक अफरातफर असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही उपनिबंधकांकडे तक्रार केली, त्यांनी वेळीच उचित कारवाई करून, अस्तित्वात असलेली समिती बरखास्त केली व

 

प्रशासकाची नेमणूक केली व जुन्या समितीने काम बरोबर न केल्याने हा आदेश त्यांनी ८७(१) कलमाद्वारे काढला.
त्यानंतर याच समितीला उपनिबंधकांनी ८३ कलमाद्वारे ‘चौकशी का करण्यात येऊ नये’ची नोटीस पाठविली, पण त्यानंतर या प्रकरणात काहीच समाधानकारक प्रगती झालेली नाही, माहितीच्या अधिकाराद्वारे आम्ही कलम ८३ द्वारे दिलेल्या नोटिसीनंतर झालेल्या कारवाईबद्दल माहिती अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सर्व कागदपत्रे (८३ नोटीसीच्या नंतरची) असल्याचे मान्य करतात, पण देण्यास टाळाटाळ करीत आहेत. (कारवाई केलेलीच नाही?)
(१) प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहून (२) ४ स्मरणपत्रे पाठवूनसुद्धा ही माहिती आम्हाला अद्याप मिळालेली नाही. या दरम्यान प्रशासकांचे निधन झाले, नवीन प्रशासक नेमला गेला, एकूण (तीन) ३ उपनिबंधक बदलले, पण काहीच प्रगती झालेली नाही. कृपया संबंधित अधिकारी याची दखल घेतील का?
महेंद्र खोबरेकर, घाटकोपर.