Leading International Marathi News Daily
शनिवार ४ एप्रिल २००९

घर कौलारू’
‘घर’ ही संकल्पना समाजाच्या जीवनशैलीचा काळानुसार परिचय करून देणारी असते. साधारणपणे स्वातंत्र्यपूर्व काळातील घरे शहरापासून दूरच्या खेडय़ांमध्ये उभी राहिली तीही समाजाच्या तत्कालिन जीवनशैलीला अनुसरून तसेच सौंदर्याचा मिलाफही त्यात आवर्जून घडविला गेला. घराच्या बाह्य आकारातील सुबकपणा आणि तत्कालिन अतंर्गत सजावट होती तरी कशी? कोणाला स्मरत असेलही पण नवीन पिढीला ती माहिती नाही. एकत्र कुटुंबपद्धतीची समाजरचना लोप पावली आहे. पण गावांमधील ती घरे ‘वाडे’, हवेली अगदी साधसुधं कौलारू घर आजही अनेक गावांमध्ये

 

ताठ उभे आहे. साधारण स्वातंत्र्यपूर्व काळामधील बांधली गेलेली ही कौलारू घरे महाराष्ट्रातल्या विविध भागात भिन्न प्रकार दर्शविणारी आहेत. त्याचे फोटो, रचना, त्यातील तत्कालिन जीवनशैलीला साजेशी छोटी छोटी सोयीसुविधा याची माहिती देणारे लेख ‘वास्तुरंग’कडे पाठवा. त्यामुळे नवीन पिढीलाही आपल्या पारंपरिक गृहरचनेचा सचित्र आनंद लुटता येईल..
चर्चा .. दुर्धटना टाळण्यासाठी
यावर्षी झालेल्या बोरिवलीतील ‘लक्ष्मी-छाया’सारख्या दुर्घटनांनी अनेकांची आयुष्ये झाकोळून गेली. पण याचा मागोवा घेतला तर लक्षात येते की अशा इमारतींकडे अनेकांगांनी झालेले दुर्लक्ष कारणीभूत आहे. अशा घटना टाळण्यासाठी काय-काय करायला हवं ते तुम्हीच ठरवायला नको का? आपला दृष्टिकोन २०० शब्दांमध्ये आमच्याकडे पाठवा.
असं सजवलं माझं घर
घराबद्दलचा प्रत्येकाचा जिव्हाळा अधिक फुलून येतो जेव्हा तुम्ही स्वत:चे घर घेता व ते अगदी आत्मियतेने सजवू पाहता. खरं म्हणजे घर म्हणजे नुसत्या चार भिंती नसतात हे तेव्हा पटतं जेव्हा घर सजविताना तुमच्या इच्छा, भावना त्या िभतीच्या रंगात समरस होऊन जातात. भिंतीबरोबरच घरातील फर्निचर, चित्रं, संगीत, दारा-खिडक्यांचे पडदे आणि अशा अनेक घटकांना घरात तुम्ही त्यांचं असं एक स्थान प्राप्त करून देता. घर केवळ या गोष्टींनी सजत नाही, तर त्यामागच्या भावनांनी, त्यांच्या साहचर्याने व उपयोगाने उभं राहातं, तुम्हालाही उभं करतं. हे सारं करताना भान राखलं जात ते खिशाचं. तरीही घर सजवण्याचे वेळ काढून करण्याचे धाडसच तर घराला अधिक फुलवते.. कधी कमी जागेत तर कधी जास्त जागेच्या वापरानं सौंदर्यवान घर नजरेसमोरून हलत नाही. तुमच्या घराचं हेच सौंदर्य दुसऱ्यांनीही पाहावं असं वाटत असेल तर जरूर घराच्या सौंदर्यपूर्ण अंतर्गतरचनेची छायाचित्रे आम्हाला पाठवा. त्याचबरोबर त्यासाठी फक्त तुम्ही केलेले प्रयत्न, तुमच्या कल्पना अगदी मोजक्या १५० शब्दांमध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह लिहून ‘वास्तुरंग’साठी पाठवा.
लेख पाठवा
घरासंदर्भातील कोणत्याही विषयात आपण तज्ज्ञ असाल आणि आपला अभ्यास आमच्या वाचकांबरोबर शेअर करू इच्छित असाल तर आमच्याशी संपर्क साधा.
घर पाहावं घेऊन
एक घर घेताना आयुष्य पणाला लागतं. काडी काडी जमवित स्वप्न साकारतं. त्याचवेळी पैशाची जमवाजमव, खाल्लेल्या खस्ता, हौसेमौजेला घातलेली मुरड, बिल्डरचे बरेवाईट अनुभव, दलालांची फिरवाफिरवी, नातेवाईकांनी केलेली मदत किंवा फिरवलेले शब्द.. अनेक अनुभव गाठीशी जमा होतात. हे अनुभव ३०० शब्दांत लिहून काढा. आणि तुमच्या फोटोसह आमच्याकडे पाठवून द्या. फूलस्केप कागदावर पुरेसा समास सोडून कागदाच्या एकाच बाजूला लेख लिहिलेला असावा. विशेष अनुभवांना आम्ही प्रसिद्धी देऊ.
मेलबॉक्स
वास्तुरंगमध्ये छापून आलेल्या लेखांवर आपल्या प्रतिक्रिया, मतमतांतरे कूलस्केप कागदाच्या एकाच बाजूवर लिहून आमच्याकडे पाठवा. मर्यादा २०० शब्दांची. मुद्देसूद पत्रांना प्रसिद्धी देऊ.
मुंबईचे भविष्यातील स्वरूप की अप्रूप?
महाराष्ट्र सरकारने गृहनिर्माण धोरणाच्या दिशेनी टाकलेली पावले नेमकी कुठे पडणार आहेत? त्यातून मुंबईचे सिंगापूर होणार की शांघाय ?..पण त्या भविष्यकालीन मुंबई शहराचे नेमके रुप सामान्य मुंबईकरांना सामावून घेईल की, त्यांना सीमेपार नेईल.. तुमच भाकित साधारण ३०० शब्दांत आमच्याकडे पाठवा.
घर-चाळींची पुनर्बाधणी की दुरुस्ती?
मुंबईतील झपाटय़ाने होत असलेले अनेक बदल पूर्वापार उभ्या असलेल्या चाळींना बदलण्यास भाग पाडू लागले आहेत. पण तरीही चाळींमधील संस्कृती, सुरक्षितता जपण्यासाठी आणि अडचणी, अपुऱ्या जागेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. कोणी पुनर्बाधणी हवी म्हणतो तर कोणी दुरुस्तीच योग्य मानतो. पण नेमके किफायती, सुविधाजनक काय? यापैकी नेमकी गरज कशाची? याविषयी आपली बाजू - मतमतांतरे साधारण ३०० शब्दांत आमच्याकडे पाठवा.
कोणताही मजकूर पाठविताना कागदाच्या एका बाजूला समास सोडून लिहावा. तसेच आपले पूर्ण नाव, पत्ता, दिनांक, दूरध्वनी क्रमांक याचीही नोंद न विसरता करावी. आपले पत्र इमेलवर पाठवितानाही आपल्या नाव व पत्त्याची, पूर्ण नावाची नोंद करावी.
पत्ता-दै. लोकसत्ता , वास्तुरंग विभाग , एक्स्प्रेस टॉवर्स , नरिमन पॉइंट , मुंंबई ४०००२१
( इमेल - vasturang@expressindia.com)

वास्तुरंग दि. २७ मार्च २००९ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेला ‘ वास्तुकला ’ या सदरातील ‘ भटकंती : मंदिर परिसरात ’ हा लेख दिलीप झुंजारराव यांनी लिहिलेला होता. दिलीप झुंजारराव यांच्या नावाऐवजी तेथे रवींद्र बिवलकर असे नाव अनवधानाने छापले गेले होते.