सायली परांजपे

संभ्रमही नाही आणि निश्चितीही नाही, हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण आहे. या क्षणाला माणूस एक आरसा होऊन जातो, त्यामध्ये जे प्रतिबिंब दिसतं त्याला कोणतीही दिशा नसते, कुठेच जाणं नसतं, काहीही करण्याची कल्पना नसते, भविष्यकाळ नसतो, ते केवळ त्या क्षणात असतं, अगदी त्या क्षणात.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

संभ्रम (Confusion) ही एक मोठी संधी आहे. जे लोक कधीच संभ्रमात नसतात, त्यांच्यापुढची समस्या मोठी असते- त्यांना वाटतं की त्यांना सगळं माहीत आहे आणि त्यांना काहीच माहीत नसतं. ज्या लोकांना वाटतं की ते अत्यंत स्पष्टतेत जगताहेत ते खरे संकटात असतात; त्यांची स्पष्टता फारच उथळ असते. खरं म्हणजे त्यांना स्पष्टतेबद्दल काहीच माहीत नसते; ते ज्याला स्पष्टता म्हणतात तो निव्वळ मूर्खपणा असतो.

मूर्ख माणसं खूपच स्पष्ट असतात- याचा अर्थ संभ्रम निर्माण होण्यासाठी आवश्यक ती बुद्धिमत्ता त्यांच्याकडे नसते.

संभ्रमात पडण्यासाठी खूप बुद्धिमत्ता लागते. फक्त बुद्धिमान लोकांनाच संभ्रमाची भावना येते. सामान्य माणसे आयुष्यात पुढे जात राहतात, हसत राहतात, पैसा जमवत राहतात, सत्ता व प्रसिद्धीसाठी संघर्ष करत राहतात. तुम्ही त्यांच्याकडे बघता, तेव्हा थोडा मत्सर वाटतो; किती आत्मविश्वास असतो त्यांच्यात, ते आनंदीदेखील दिसतात.

त्यांना यश मिळत असेल, तर त्यांच्याकडचा पैसाही वाढतो, त्यांच्या हातातली सत्ता वाढते, त्यांची प्रसिद्धी वाढत जाते, मग तुम्हाला थोडा मत्सर वाटतोच. तुम्ही किती संभ्रमात असता आणि ते त्यांच्या आयुष्याबद्दल किती स्पष्ट असतात; त्यांना दिशा असते, त्यांच्यापुढे उद्दिष्ट असतं, ते कसं साध्य करायचं ते त्यांना माहीत असतं आणि त्यांना ते जमतही असतं, ते साध्य करतच असतात, जिन्याची एकेक पायरी वर चढत असतात. आणि तुम्ही नुसते उभे असता, काय करावं आणि काय करू नये याबाबत संभ्रमात पडलेले, काय बरोबर आणि काय चूक याबाबत गोंधळलेले. पण हे असं नेहमीच होत आलंय; म्हणून सामान्यांमध्ये निश्चिती असते. अधिक बुद्धिमानांना संभ्रम, अराजक (उँं२) जाणवत राहते.

संभ्रम ही एक मोठी संधी आहे. तो नेहमी सांगत असतो की मनाच्या माध्यमातून गेलात तर कुठलाच मार्ग नाही. तुम्ही खरोखरच गोंधळलेले असाल, तर तुम्हाला मोठे वरदान प्राप्त झाले आहे. आता काहीतरी शक्यता आहे; काहीतरी खूप मोलाचं शक्य आहे; तुम्ही काठावर आहात. तुम्ही पूर्णपणे संभ्रमात असाल तर याचा अर्थ तुमचं मन अपयशी ठरलंय; आता हे मन तुम्हाला कोणत्याही प्रकारची निश्चिती पुरवणार नाही.

आता तुम्ही मनाच्या मृत्यूच्या अधिकाधिक समीप येत आहात. आणि ही कोणत्याही माणसासाठी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे, सर्वात मोठं वरदान आहे- कारण मन हाच गोंधळ आहे आणि मनाच्या माध्यमातून गेलात तर कोणताच मार्ग नाही हे एकदा तुम्हाला कळलं, की तुम्ही किती काळ मनाला चिकटून राहाल? कधी ना कधी तुम्हाला मनाचा त्याग करावाच लागेल; अगदी तुम्ही त्याचा त्याग केला नाहीत, तरी ते स्वेच्छेने गळून पडेल. संभ्रम इतका जास्त असेल, त्याचं ओझं इतकं वाढेल की केवळ त्याच्या वजनाने मन गळून पडेल. आणि एकदा का मन गळून पडलं की, संभ्रम नाहीसा होतो.

तुम्ही निश्चितीपर्यंत पोहोचाल असं मी म्हणू शकत नाही, कारण हा शब्दही केवळ मनाला आणि मनाच्या जगाला लागू पडणारा आहे. जेव्हा संभ्रम असतो, तेव्हाच निश्चिती असते; जेव्हा संभ्रम नाहीसा होतो, तेव्हा निश्चितीही नाहीशी होते.

तुम्ही केवळ स्पष्ट असता- संभ्रमही नाही आणि निश्चितीही नाही, केवळ स्पष्टता, पारदर्शकता. आणि त्या पारदर्शकतेत सौंदर्य आहे, त्या पारदर्शकतेत दिमाख आहे, ती पारदर्शकता अत्युत्कृष्ट आहे.

संभ्रमही नाही आणि निश्चितीही नाही, हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण आहे. या क्षणाला माणूस एक आरसा होऊन जातो, त्यामध्ये जे प्रतिबिंब दिसतं त्याला कोणतीही दिशा नसते, कुठेच जाणं नसतं, काहीही करण्याची कल्पना नसते, भविष्यकाळ नसतो, ते केवळ त्या क्षणात असतं, अगदी त्या क्षणात.

जेव्हा मन नसतं, तेव्हा भविष्यकाळही नसतो. भविष्यकाळासाठी आखलेले बेत नसतात. तेव्हा हा क्षणच सर्व काही असतो, सर्व काही; या क्षणात तुमचं संपूर्ण अस्तित्व सामावलेलं असतं. अवघं अस्तित्व या क्षणात एकरूप होऊ लागतं आणि तो क्षण लक्षणीय होऊन जातो. त्याला खोली असते, उंची असते, रहस्य असतं, उत्कटता असते, आग असते, तात्कालिकता असते, हा क्षण तुमच्यावर पकड घेतो, तुमचा ताबा घेतो, तुमचा कायापालट करतो.

पण मी तुम्हाला निश्चिती देऊ  शकत नाही; निश्चिती दिली जाते ती ज्यातून काहीच निष्पन्न होणार नाही अशा विचारातून. निश्चिती म्हणजे दुसरंतिसरं काहीच नाही, तर तुमच्या संभ्रमित अवस्थेला ठिगळं लावणं आहे. तुम्ही संभ्रमात पडलेले असता. कोणीतरी म्हणतं, ‘‘काळजी करू नका,’’ आणि हे खूप अधिकारवाणीने सांगितलं जातं, युक्तिवाद करून पटवून दिलं जातं, धर्मग्रंथांचा आधार घेऊन सांगितलं जातं. तुमचा संभ्रम सुंदर पांघरुणाने झाकला जातो- बायबलच्या, कुराणाच्या किंवा गीतेच्या पांघरुणाने. तुम्हाला बरं वाटतं पण ते तात्पुरतं असतं, कारण गोंधळ तर आतमध्ये उकळत असतो. तुमची त्याच्यापासून सुटका झालेली नसते, तो फक्त दाबला जातो.

बुद्धिमान व्यक्ती संकोचते, विचारात पडते, हेलकावे खाते. बुद्धी नसलेले कधीही हेलकावे खात नाहीत, डगमगत नाहीत. शहाणा माणूस कुजबुजत बोलेल, तर मूर्ख माणूस घराच्या गच्चीवरून जोरात घोषणा करेल.

लाओ त्झू म्हणतात, ‘‘मी कदाचित जगातला एकटाच डोक्यात संभ्रम घेऊन जगणारा माणूस असेन. माझ्या व्यतिरिक्त जगातल्या सगळ्यांनाच निश्चिती आहे असं वाटतं.’’ त्यांचं बरोबर आहे; त्यांची बुद्धिमत्ता इतकी प्रचंड आहे की त्यांना कशाबद्दलही खात्री वाटू शकणार नाहीत..

तुम्ही मनाचा त्याग केलात तरी मी तुम्हाला निश्चितीचं वचन देऊ  शकत नाही. मी तुम्हाला एकच वचन देऊ  शकतो, ते म्हणजे तुमच्यात स्पष्टता येईल हे. तुमच्यात स्पष्टता, पारदर्शकता येईल, तुम्ही गोष्टी त्या जशा आहेत, तशा बघू शकाल.

ओशो, द बुक ऑफ विस्डम,

टॉक #४/ओशो टाइम्स इंटरनॅशनल/

सौजन्य -ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

www.osho.com