‘लोकरंग’मधील (३० एप्रिल) अजित अभ्यंकर यांचा ‘मार्क्‍सवाद नव्हे, भांडवलशाहीच संदर्भहीन झाली आहे!’ हा लेख वाचला. मार्क्‍सवाद, साम्यवाद, समाजवाद यांची पाळेमुळे समाजातल्या विषमतेशी येऊन मिळतात. या वादांची उद्दिष्टे वंचित, शोषित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रेरित करण्याची होती. देशाच्या मालमत्तेची सम प्रमाणात वाटणी, अटीविरहित संधींची समान उपलब्धता, भांडवलशाहीचे खच्चीकरण, विषमतेचे मूळ नष्ट करून खऱ्या मानवतेची पायाभरणी, समान  राहणीमान होण्यासाठी धोरणे, समाजातील एकी वृिद्धगत करणे अशी विधायक उद्दिष्टे अमलात आणण्यासाठी अनेक ‘वादां’नी जन्म घेतले; पण तरीही त्यातून अपेक्षित यश हाती लागले नाही. याबद्दलचे आत्मचिंतन डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते करीत नाहीत.

सद्धान्तिक-तात्त्विक मांडणी आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतर वा तफावत कमी करताना समाजवादाची तत्त्वे मूळ स्वरूपात कधीच अमलात आणता येत नाहीत. उत्पन्नांचे स्रोत दुर्बलांकडे कितीही वळवले तरी सबलीकरण एका पातळीवर येऊ शकत नाही. आणि मग तत्त्वांचा बीमोड सुरू होतो.

virar, violation of safety norms, global city, sewage treatment plants
विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
t plus zero settlement system marathi news, what is t plus zero settlement in marathi
विश्लेषण: आजच व्यवहार, आजच सेटलमेंट… शेअर बाजाराच्या T+0 प्रणालीचे आणखी कोणते फायदे?

नियंत्रित अर्थव्यवस्था ही विकासाला प्रतिबंध घालते, हे विधान आर्थिक उदारीकरणाच्या दृष्टीने समर्पक वाटले तरी जागतिकीकरणाची कास धरलेल्या अनियंत्रित अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम कमी होऊ न शकलेल्या आíथक विषमतेने दाखवून दिले आहेच. समांतर आíथक यंत्रणा कह्य़ात आली तर हा पैसा अनेक मार्गानी अनेकांच्या हाती प्रत्याप्रत्यक्ष रूपात उपलब्ध होऊ शकेल; जो सामाजिक विकासासाठी उपयुक्त ठरू शकेल.

– किरण इनामदार, मुंबई</strong>

मनुष्यत्वाच्या संकल्पनेचा विचार व्हावा

‘‘नो इझम्’ काळाचे रहिवाशी!’ हा अतुल कुलकर्णी यांचा लेख वाचला. सद्य:परिस्थितीत आधी अस्तित्वात असलेला कुठलाही इझम् किंवा कुठलेही तत्त्वज्ञान उपयोगी नसून कालानुरूप नवीन तत्त्वज्ञान जन्माला येण्याची आवश्यकता आहे, असे लेखकाने म्हटले आहे. पण त्यासाठी आíथक- सामाजिक- राजकीय- तांत्रिक बदलांचा सध्या जो प्रचंड वेग आहे तो आटोक्यात येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा माणसातल्या माणुसकीची कदर व आदर करणारी ‘मनुष्यत्वाची संकल्पना’ राबवण्याची शक्यता आहे का, ते पाहिले पाहिजे. मानवाला शारीरिक व बौद्धिक श्रमांतून जो सर्जनाचा आनंद मिळतो तो मनमुराद लुटण्यासाठी त्याला पसा वा संपत्ती (आणि सत्ता) या संकल्पनांचा खरा ‘अर्थ’ समजावून सांगणे आवश्यक आहे. जगाच्या इतिहासात औद्योगिक क्रांती, संगणक क्रांती किंवा माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट असे कितीही बदल होत आले तरी एक शाश्वत मानवी सत्य कायम अबाधित राहील, ते म्हणजे- अन्न, वस्त्र, निवारा तसेच कौटुंबिक स्वास्थ्य या गोष्टींची त्याला असणारी गरज. या मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्याच्या ऐहिक वा सांपत्तिक गरजेची आरोग्य, शिक्षण, कुटुंब-समाजस्वास्थ्य या गोष्टीशी योग्य ती सांगड घालून त्याचे योग्य नियोजन करणारे एक सर्वस्पर्शी तत्त्वज्ञान वा इझम् जन्माला येण्याची आवश्यकता आहे. हे तत्त्वज्ञान कालानुरूप होणाऱ्या बदलांशी सुसंगत आणि मुख्य म्हणजे माणुसकी व तर्कशुद्ध विवेकबुद्धी यांवर आधारित असावे.

– चित्रा वैद्य, पुणे</strong>

देशातही गुप्तहेरांचे अस्तित्व दिसावे..

‘काळोखातल्या झुंजार कथा’ हा रवि आमले यांचा लेख वाचला. भारतीय गुप्तहेर खात्याची अतुलनीय कामगिरी वाचून आनंद झाला. पाकिस्तानी लष्करातील त्यांचे अस्तित्व तर त्यांच्या शिरपेचातील मानाचा तुराच ठरावा. आता गरज आहे ती पाकिस्तानच्या आपल्या देशातील कारवाया थांबविण्याची. खरे यश तेव्हाच मानता येईल- जेव्हा काश्मिरात होणारा रक्तपात थांबेल. लेखकाने बांगलादेशाच्या निर्मितीमुळे भारताचा कोणता फायदा झाला, याबद्दलही लिहावे. कारण आजपर्यंत बांगलादेशबद्दल ज्या बातम्या आपल्याकडे छापून आल्या त्यात प्रामुख्याने बांगलादेशी घुसखोरांमुळे निर्माण झालेल्या समस्याच अधिक होत्या. आसामात तर हा प्रश्न आजही कायम आहे. तसेच पाकिस्तान व अमेरिकेसहित जगातील अन्य देशांत आपल्या गुप्तहेर खात्याचे अस्तित्व आहे, हे वाचल्यावर ते तसे देशांतर्गत का दिसत नाही, असा प्रश्न पडला. देशातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी गुप्तहेरांचा वापर केल्यास देशाची अंतर्गत व बा सुरक्षा मजबूत होऊ शकेल.

– सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड</strong>

इंदिरा गांधींचे परिपक्व राजकारण

रवि आमले यांचा ‘काळोखातल्या झुंजारकथा’ हा लेख म्हणजे ‘रॉ’ या आपल्या गुप्तहेर यंत्रणेची जशी यशोगाथा आहे, तशीच ती इंदिरा गांधी यांच्या परिपक्व राजकारणाची, त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या अचूक निर्णयांची आणि गुप्तचर सेवेतील अधिकाऱ्यांच्या योग्य निवडीचीही यशोगाथा आहे. एकदा कामगिरी सोपविल्यावर त्यात हस्तक्षेप न करता ती फत्ते कशी होईल याची आखणी करणे हे तसे अवघडच काम. ‘रॉ’चे प्रमुख काव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेकदा ते यशस्वीरीत्या करून दाखवले. त्यात त्यांना दिला गेलेला मुक्त हस्त  अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. तसेच पार पाडलेल्या प्रत्येक यशस्वी मोहिमेचा लगेच डांगोरा पिटणे हे मुरब्बी राजकारण्याला व गुप्तहेर खात्यातील अधिकाऱ्यांना आवश्यक वाटत नाही. किंबहुना, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने ते गरसोयीचेच असते.

– आल्हाद धनेश्वर

फेसबुकी लेखनाला प्रतिष्ठा!

राजीव काळे यांचा ‘लिहावे (फेसबुकवरीही) नेटके’ हा लेख वाचला. दिल्ली विद्यापीठाने फेसबुकवरच्या लेखनाला तंत्रशुद्ध अभ्यासाच्या रूपात सादर करण्यासाठी पावले उचलली आहेत, ही माहिती उत्साहवर्धक आहे. ज्या लिखाणाची सहसा हेटाळणीच होते अशा लेखनातील नवनीत शोधून त्यास आकार देणे गरजेचेच होते. या माध्यमातील दर्जेदार, पण उपेक्षित लेखनाला आकार देणारे एखादे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, ही दिलासा देणारी बाब आहे. साहित्यिक दर्जा, रसनिष्पत्ती, गोडवा जपून फेसबुकवर लिखाण करणारे आहेत. त्यांच्या त्यांच्या मित्रमेळ्यांत ते रसग्रहण, चर्चासत्र इ.द्वारे त्याचा आस्वादही घेतात. पण या माध्यमांतील हिणकस लिखाणाचाच गवगवा होतो. त्यामुळे दर्जेदार साहित्य लिखाणाला अधिकृत बठक देणारी यंत्रणा आवश्यकच आहे. जे कसदार असते ते आपोआप पुढे येतेच, वगरे खरे असले तरी योग्य ती प्रसिद्धी मिळाली की नवलेखकांना हुरूप येतो, हेही तितकेच खरे आहे.

– दिलीप रा. जोशी, नाशिक