पालघर : तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अनेक मंत्र्यांनी व नेत्यांनी जिल्हा दौरा केला. परंतु प्रत्यक्षात ठोस मदत अजूनही मिळाली नाही.  गुरुवारी   सहा जणांचे केंद्रीय पथक जिल्हा दौऱ्यावर आल्यामुळे   विविध क्षेत्रात नुकसान झालेल्या वादळग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

तौक्ते चक्रीवादळानंतर प्रथमच हे केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले. पालघरसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यतही हे पथक पाहणी करणार असून नुकसानीचा आढावा घेणार आहे. हा दौरा संपल्यावर सर्व नोंदींचा एकत्रित अहवाल सादर करून तो केंद्राकडे सादर केला जाणार आहे. पालघर जिल्ह्यत आलेल्या या केंद्रीय पथकाने सर्वप्रथम वसई येथील विविध नुकसान झालेल्या भागात भेटी दिल्या व तेथील शासकीय यंत्रणेचा आढावा घेतला.

महाराष्ट्रात जांभुळगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहाडोली येथील नुकसानग्रस्त भागाला या पथकाने भेट दिली. पावसामुळे तसेच चक्रीवादळामुळे जांभळाचे मोठे नुकसान झाले होते. अनेक  (पान ४ वर)

ठोस सरकारी आर्थिक मदत अजूनही मिळालेली नाही. १८ हजार रुपये हेक्टर मर्यादेत जाहीर केलेली मदत कमी आहे. किमान ५० हजार हेक्टर प्रमाणे नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.

-मनीषा पाटील, जांभूळ उत्पादक, बहाडोली