News Flash

आशेरी गडावरील पर्यटकांवर गुन्हे दाखल

पावसाळा सुरू होताच पर्यटकांना गड-किल्ल्यांवर पर्यटनासाठी ओढ लागली आहे

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत वाडा खडकोना या गावातील आशेरी गडावर  शनिवार, रविवारी मुंबई – ठाणे, गुजरात येथून हजारोच्या संख्येने गर्दी करुन संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत तब्बल ४० हजार ६०० चा दंडवसूल करण्यात आल्याची माहिती कासा पोलीसांनी दिली.

पावसाळा सुरू होताच पर्यटकांना गड-किल्ल्यांवर पर्यटनासाठी ओढ लागली आहे . त्यातच निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची पावलेही पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. शनिवार, रविवार पर्यटकांनी हजारोच्या संख्येने वाडा खडकोना या गावातील आशेरी गडावर मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. पालघर मधील आशेरी गडावर नागरीकांची हजारोच्या संख्येने तुफान गर्दी करत प्रशासनाने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले आहे. रविवारची सुट्टी असल्याने  हजारो च्या संख्येने पर्यटक  पालघर सह  मुंबई – ठाणे, गुजरात या बड्या शहरातील हजारो पर्यटक गडावर दाखल झाले आहे. पर्यटकांनी चित्रित केलेले  व्हिडीओ फेसबुक, वाटसापमधून  समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर प्रशासनाने आशेरीगडावर जाऊन कारवाई केली. कासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक हिम्मत सरगर, पांडुरंग कावळे आणि कासा पोलीस कर्मचार्यांनी ही कारवाई केली.जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना पर्यटकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

करोनाचे संकट हळूहळू कमी होऊ लागल्याने पर्यटकांचा ओढा हा पर्यटनस्थळी वाढू लागला होता. त्यातच रविवारी पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. यामुळे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव व इतर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 1:01 am

Web Title: crimes filed against tourists at asheri fort akp 94
Next Stories
1 पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यांवर तेलतवंग
2 जीव मुठीत धरून नदी प्रवास
3 नगर परिषदेच्या ‘धोकादायक’ कार्यालयाचे स्थलांतर
Just Now!
X