News Flash

‘आरटीओ’ उमरोळीत

विरारच्या पूर्वेला सन २०११ मध्ये भाड्याच्या जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात आले.

ट्रान्सपोर्ट विभागातील सर्व वाहनांची विशिष्ट कालावधीनंतर ट्रॅकवर चाचणी घेऊन तपासणी करणे आवश्यक असते.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी पाच हेक्टर जमीन

पालघर : जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासाठी पालघर तालुक्यातील उमरोळीजवळील पाच हेक्टर जमीन देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा परिवहन कार्यालयाचा तसेच वाहन ‘टेस्टिंग ट्रॅक’चा प्रश्न मार्गी लागणार आहे.

विरारच्या पूर्वेला सन २०११ मध्ये भाड्याच्या जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात आले. या कार्यालयामार्फत दरवर्षी किमान ४०-४५ हजार वाहनांची नोंदणी व ४० हजार वाहनांचे परवाना नूतनीकरण करण्यात येते. परिवहन विभागाचे जिल्ह्यात कायमस्वरूपी कार्यालय स्थापन करण्यासाठी वसई व पालघर तालुक्यातील मनोरजवळील काही जागा विचाराधीन होत्या. या जागांबाबत तांत्रिक अडचणी पुढे आल्यानंतर वसई तालुक्यातील गोखिवरे येथील सर्व्हे नंबर २३३ मधील ३.३० हेक्टर आर जमिनीची नोंद उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांच्या नावे करण्याच्या प्रक्रियेत लगतच्या जमीन मालकाने या जागेबाबत सहदिवाणी न्यायाधीश (वसई) यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्यामध्ये न्यायालयाने मनाईहुकूम दिल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारणीचे काम रेंगाळले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी येथील उमरोळी गावातील सर्व्हे क्र. ३०८ मधील ५ हेक्टर जागा परिवहन विभागाला उपप्रादेशिक कार्यालय उभारणीसाठी दिल्याने जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सद्य:स्थितीत विरारमध्ये ‘टेस्टिंग ट्रॅक

ट्रान्सपोर्ट विभागातील सर्व वाहनांची विशिष्ट कालावधीनंतर ट्रॅकवर चाचणी घेऊन तपासणी करणे आवश्यक असते. सध्या विरार येथील उपप्रादेशिक कार्यालयाजवळ असलेल्या एका खासगी जागेत हा टेस्टिंग ट्रॅक उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:17 am

Web Title: five hectares of land for sub regional transport office akp 94
Next Stories
1 ‘त्या’ सात लोकप्रतिनिधींचे कर्तृत्व अजूनही आठवणीत
2 निर्बंध शिथिलतेच्या उत्साहावर ‘पाणी’
3 राज्य परिवहन बससेवा पूर्ववत
Just Now!
X