आरोग्य संघटनांमध्ये नाराजी, काम बंदचा इशारा

पालघर : चुकीच्या अफवांमुळे गांजेढेकाळे व जायशेत परिसरांत जिल्हा परिषदेच्या जनजागृती करणाऱ्या आरोग्य पथकावर हल्ला झाला होता. हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन गावगुंडांना पोलिसांनी पकडले असले तरी दोन आठवडे उलटल्यानंतरही यातील इतर आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरल्याचे आरोप होत आहेत. इतर आरोपींना अटक होत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. इतर आरोपींना पोलिसांनी अटक न केल्यास काम बंद आंदोलन करणार असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे.

पालघर तालुक्यातील गांजेढेकाळे व जायशेत परिसरांत करोनाबाबतच्या जनजागृतीसाठी जात असताना काही गावगुंडांनी २ जूनला आरोग्य पथकावर हल्ला केला होता. या पथकातील डॉक्टरांसह आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, गटप्रवर्तक व वाहनचालक यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले होते. तसेच जनजागृती करणाऱ्या चित्ररथाची तोडफोडही केली होती. प्रसंगावधान राखत तेथून पळ काढल्याने पथकातील सगळ्यांचा जीव वाचला. यानंतर मनोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

या घटनेत १० ते १२ आरोपी सहभागी होते. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. मात्र इतर आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने आरोग्य संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करावी, अशी आग्रही मागणी केली.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करून या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना अटक करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या शोधमोहिमेदरम्यान आरोपी त्यांच्या कुटुंबीयांसह जंगलात पसार होत असल्याने त्यांना पकडणे पोलिसांना अवघड होऊन बसले आहे, असे पोलीस विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

आरोपींना अटक न केल्यामुळे जिल्ह्यतील आरोग्यसेवा कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी असून या आरोपींना अटक न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष बालाजी सातपुते यांनी दिला आहे.

आरोग्य पथकावर हल्ला झाल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद जिल्हाभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पसरले. आरोग्य कर्मचारी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला होता. अधिकारी वर्गापासून कर्मचारी वर्गापर्यंत काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला.

आरोपी शोधमोहीम सुरू असताना ते जंगलात पसार होत आहेत. त्यामुळे त्यांना शोधणे अवघड होत आहे. मात्र ही शोधमोहीम आरोपींना अटक करेपर्यंत सुरू राहणार आहे. लवकरच आरोपींना अटक करू.

– विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर