मनोर-पालघर महामार्गावर मासळी विक्रीस नागरिकांच्या विरोधानंतर मज्जाव

पालघर : पालघर शहरातील मनोर-पालघर महामार्गावर  मासळीविक्री करण्यावर प्रशासनाकडून निर्बंध येत असल्याने त्या विरोधात मच्छीमार विक्रेते आक्रमक झाले आहेत. मंगळवारी पालघर नगर परिषदेच्या  अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर या मच्छीमारांना मासेविक्री करण्यास मज्जाव केल्यानंतर मच्छीमार आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.

मासळी विक्रेत्यांच्या मासेविक्रीसाठी जागेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे मच्छीमार पालघर शहरातील पालघर-मनोर मार्गावर मासेविक्री करतात. परंतु अनेक नागरिकांचा या मासळी विक्रीच्या ठिकाणाला विरोध आहे. या ठिकाणी माशांचा जैविक कचरा व दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचल्याने नागरिकांना त्रास होत असल्यामुळे या ठिकाणासाठी अनेक नागरिकांची नापसंती होती. मासे विक्रेत्यांना अपुरी पडणारी जागा व नागरिकांना होणारा त्रास या दोन्ही गोष्टी लक्षात घेता नगर परिषदेने पालघर नगर परिषद हद्दीत जुना पालघर येथे अद्ययावत मासळी बाजारासाठी प्रस्ताव मंजूर केला आहे. काही तांत्रिक कारणास्तव तो रखडला आहे. हा प्रस्ताव व मासळीबाजार पूर्ण होईपर्यंत पालघर नगर परिषद क्षेत्रात नगर परिषद प्रशासन व मच्छीमारांचे प्रातिनिधिक मंडळ मासेविक्री करण्यासाठी विविध जागांचा शोध घेईल व अशा जागेवर मच्छीमारांना मासे विक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल असेही या वेळी सांगण्यात आले.

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती

पूर्वी या मासळी विक्रेता महिला होली स्पिरिट हायस्कूलच्या समोर मासे विक्रीसाठी बसत होत्या मात्र भाजपच्या एका नगरसेवकाने याविरोधात तक्रार केल्यामुळे त्यांना तेथून हटवण्यात आले व आताही त्याच नगरसेवकने तक्रार केल्यामुळे नगर परिषद प्रशासन येथे कारवाईला आली होती ज्यावेळेस कारवाई सुरू होती त्यावेळेस नगरसेवक तेथे उपस्थित नव्हते असे सांगितले जाते.

दरम्यान, मंगळवारी नगरपरिषद प्रशासनाने मासेविक्री महिलांवर कारवाईसाठी गेल्यावर   नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्याने मासळीच्या टोपलीला लाथ मारल्यामुळे ही वादावादी झाल्याचे सांगितले जात आहे

प्रशासनाची सहकार्याची तयारी

मच्छीमार समाजाचे प्रतिनिधी याबाबत चर्चा करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे   बुधवारी गेले होते. या चर्चेदरम्यान मासळी विक्रेत्या महिला महामार्गावर मासळी विक्रीसाठी बसत असल्यामुळे तेथे अपघाताची शक्यता आहे.  महामार्गावर स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे, असे विक्रेत्यांना सांगितले.  विक्रीची जागा स्थलांतरित करण्यास त्यांना सांगण्यात आले. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असतील त्या ठिकाणी  विक्रेत्यांना मासळी विक्रीसाठी परवानगी दिली जाईल, असे नगर परिषदेतर्फे सांगण्यात आले. तरीही महामार्गावर मासे विक्रीसाठी परवानगी द्यावी ही मागणी या शिष्टमंडळाने केली असता नगर परिषद प्रशासनाने  ती ऐकून घेतली. मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.