डहाणू :  मुसळधार पवसामुळे डहाणू शहरातून जाणारी कंक्राटी नदीला महापूर आल्याने डहाणू शहराला जोडणारा पुलावरील रस्ता पुर्णपणे उखडला. त्यामुळेवाकी, कोसबाड, बोर्डी कडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी  धोकादायक बनला आहे.  विलातपाडा येथे रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने चिखलगाळात राहण्याची वेळ नागारिकांवर ओढवली आहे. अनेकांचे संसार उघडय़ावर आले असून सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

कंक्राटी नदीने रौद्ररुप धारण केल्याने डहाणू शहरातील ईराणी रोड, जलाराम मंदीर, प्रभूपाडा, मसोली, या भागात हाहाकार माजवला. मुख्य रस्त्यावरुन पुराचे लोट वाहू लागल्याने ईराणी रोड, जलाराम मंदीरवपरिसराला पूराचा वेढा पडला. नदीच्या रौद्र रुपामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले तर बाजारपेठ पाण्याखाली गेली. डहाणू बस आगारची भिंत कोसळल्याने आगाराच्या बसेस जलवेढय़ात सापडल्या. डहाणू आगाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. डहाणू  प्रांत असिमा मित्तल, तहसीलदार, मुख्याधिकारी राहूल सारंग, आमदार विनोद निकोले, नगराध्यक्ष भरत राजपूत यांनि नुकसानीची पाहणी केली नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे आश्वासन दिले.