|| नीरज राऊत

१९८०-९० दशकातील लोकप्रतिनिधींची फळी काळाच्या पडद्याआड

पालघर : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व सध्याच्या पालघर जिल्ह्याच्या परिसरात एकेकाळी राजकीय नेतृत्व करणारी आदिवासी आमदार-खासदारांची फळी गेल्या काही वर्षांत काळाच्या पडद्याआड गेली आहे.  ग्रामीण भागाची दोन दशकांहून अधिक काळ ओळख असणाऱ्या या नेतेमंडळींच्या ‘एक्झिट’मुळे एका अर्थाने जिल्हा पोरका झाला आहे. मात्र त्यांच्या कर्तृत्वाच्या खाणाखुणा अजूनही ताज्या असल्याचे दिसत आहेत.

Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

तत्कालीन ठाणे जिल्ह्यात व मतदारसंघ फेररचनेपूर्वी (डीलिमिटेशन) वसई व पालघर तालुका हा उत्तर मुंबई मतदारसंघात, तर सध्याच्या जिल्ह्याचा अधिकतर भाग डहाणू (अनुसूचित जमाती) लोकसभा क्षेत्रात येत असे. त्याबरोबरीने पालघर, डहाणू व जव्हार या तीनही विधानसभा जागा आदिवासी प्रतिनिधींसाठी राखीव होत्या. काँग्रेस पक्षाचे दामू शिंगडा, शंकर नम तसेच भाजपचे अ‍ॅड. चिंतामण वनगा, विष्णू सावरा यांच्यासह कृष्णा घोडा यांनी या राखीव क्षेत्रामधून दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. गेल्या काही वर्षांत या माजी लोकप्रतिनिधींचे  एकामागून एक असे निधन झाल्याने एकेकाळचे राजकीय प्रभुत्व गाजवणाऱ्या या मंडळींच्या अनुभवाला समाज मुकला आहे.

हे सर्व लोकप्रतिनिधी हे आदिवासी समाजाचे असल्याने समाज घटकांमधील विकास घडवून आणण्यासाठी, परिसरातील पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. या मंडळींची आदिवासी समाजाशी नाळ जोडली गेली होती. समाज बांधवांच्या लग्नसमारंभ व इतर सुख-दु:खात ते सहभागी होत असत. तत्कालीन ठाणे जिल्ह्याचा हा आदिवासीबहुल भाग असल्याने या भागाची समस्या मांडण्यासाठी तसेच भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी या लोकप्रतिनिधींचे प्रयत्न राहिले. नव्या जिल्ह्यातील भागाचा १९८० ते २०१४ दरम्यानचा ते जणू चेहरा होते. या प्रमुख आदिवासी नेत्यांच्या निधनाने पालघर जिल्ह्याच्या भागावर अभिराज्य करणारी एक पिढी जवळपास संपुष्टात आली असून नवीन नेतृत्व उदयास येऊ लागले आहे.

कृष्णा घोडा

डहाणू विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे कृष्णा घोडा (६०) यांचे २४ मे २०१४ रोजी हृदयविकाराने अकस्मात निधन झाले. त्यांनी १९९८, १९९९ व २००४ या विधानसभा निवडणुकीत डहाणूमधून, तर २०१४ मध्ये शिवसेनेतर्फे पालघरमधून प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव अमित घोडा यांनी उर्वरित काळात आमदार म्हणून निवडून आले होते.

विष्णू सावरा

१९९०, १९९५, १९९९ व २००४ मधील विधानसभा निवडणुकीत वाड्याचे  तसेच २००९ मध्ये भिवंडी ग्रामीण तर २०१४ मध्ये विक्रमगडचे प्रतिनिधित्व करणारे विष्णू सावरा (७०)  ९ डिसेंबर २०२० रोजी पडद्याआड गेले. सलग सहा विधानसभा  जिंकणाऱ्या  सावरा यांना युती सरकारमध्ये आदिवासी विकासमंत्री तसेच पालघरचे पालकत्व देण्यात आले होते. त्यांनी भाजपच्या पक्षीय जबाबदाऱ्यांचा सांभाळ केला होता.

शंकर नाम

दामू शिंगडा यांचे व्याही  आदिवासी व अन्य विभागाचे उपमंत्रीपद भूषवणारे शंकर नाम (७२) यांचे ५ जून रोजी निधन झाले. १९८५  ते १९९५ साली डहाणू विधानसभा तर १९९८ मध्ये डहाणू लोकसभा क्षेत्रातून ते निवडून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असा प्रवास होता.

अ‍ॅड. चिंतामण वनगा

३० जानेवारी २०१८ रोजी दिल्ली येथे अकस्मात निधन झाले. अ‍ॅड. चिंतामण वनगा (६२) यांनी १९९६, १९९९ (डहाणू) व २०१४ (पालघर)च्या लोकसभा निवडणुकीत विजय झाले होते.  २००९च्या विधानसभा निवडणुकीत  विक्रमगडचे प्रतिनिधित्व केले होते.  संसदीय समित्यांचे सदस्य होते.भाजपमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या.

दामू शिंगडा

१९८०, १९८४, १९८९, १९९१ व  २००५ या लोकसभा निवडणुकांमध्ये डहाणू मतदारसंघातून निवड. काँग्रेसचे दामू शिंगडा (६७) यांचे २ मे २०२१ करोनामधून बरे होत असताना अकस्मात निधन झाले. पालघर ग्रामीण भागाचे दिल्लीत प्रतिनिधित्व केले. काँग्रेस पक्ष व गांधी घराण्याशी ते  एकनिष्ठ होते.  ग्रामीण आदिवासी चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.

पास्कल धनारे

२०१४ विधानसभेवर डहाणू मतदारसंघातून भाजपतर्फे   निवडून आलेले व पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळणारे पास्कल धनारे (४९) यांचे १२ एप्रिल रोजी करोनामुळे मृत्यू झाला.

नवनीतभाई शहा

१९५७ व १९६७ विधानसभा निवडणुकीत पालघरचे नेतृत्व  तसेच १९६२ झाली पंचायत समिती सभापतीपद भूषवणारे समाजवादी नेते नवनीतभाई शहा (९६) यांचेदेखील २६ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले. आदिवासी बांधव व मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यात त्यांचे योगदान होते.