पालघर/कासा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाअंतर्गत तलासरी तालुक्यातील झाई येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथीची विद्यार्थिनी सारिका भरत निमला हिचा शनिवारी मृत्यू झाला. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीत  १३ विद्यार्थ्यांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान एका विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर इतर विद्यार्थ्यांचे पालक भयभीत झाले असून शाळेनेही आठवडाभराची सुट्टी जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झाई  आश्रमशाळेत २४१  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये २०६ निवासी असून त्यामध्ये ९५ मुलींचा समावेश आहे.  मृत्यू झालेल्या सारिकासह काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, पोटदुखी व तापासाठी शुक्रवारी देहेरी येथील रुग्णालयात  औषधोपचार करण्यात आले होते. शनिवारी सकाळी न्याहारी करताना सारिका बेशुद्ध पडली. घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यापूर्वी तिचे निधन झाले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 students of zai ashram school in admitted in hospital after symptoms disease found
First published on: 12-07-2022 at 00:22 IST