एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात १५ प्रवासी जखमी ; साखरे घाटातील घटना

डहाणू तालुक्यातील साखरे घाटात येताच एका वळणावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.

एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात १५ प्रवासी जखमी ; साखरे घाटातील घटना
डहाणू तालुक्यातील साखरे घाटात येताच एका वळणावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.

बोईसर : डहाणू तालुक्यातील साखरे घाटात भुसावळ बोईसर एस टी बस आणि ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.या अपघातात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना ऐना आणि वाणगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळी भुसावळ वरुन निघालेली बोईसर एस टी बस नाशिक जव्हार कासामार्गे संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास डहाणू तालुक्यातील साखरे घाटात येताच एका वळणावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. बसमध्ये एकूण २३ प्रवासी होते त्यापैकी १५ प्रवासी हे जखमी झाले असून ५ जणांना ऐना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर १० जखमी प्रवाशांना वाणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अचानक दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांवर धडकल्याने बहुतेक प्रवासी पुढील सीटच्या लोखंडी दांडीवर आदळून त्यांच्या नाका—तोंडाला जखमा झाल्या आहेत.अपघाती घटनेचा अधिक तपास वाणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत कोळी हे करीत आहेत.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बोईसर एमआयडीसी पोलीस तणावात ; लोकसंख्येसह गुन्हेगारीत वाढ; गंभीर गुन्ह्य़ांचे प्रमाण ३५ टक्के 
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी