बोईसर / कासा : मुंबई-बडोदा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाचे काम सध्या पालघर जिल्ह्यात सुरू आहे. डहाणू तालुक्यातील गंजाड ते तलासरीपर्यंत डोंगर सपाटीच्या कामात गंजाड ग्रामपंचायत हद्दीतील नवनाथ कोहराळी पाडा येथे प्रचंड क्षमतेचे भूसुरुंग स्फोट केले जात आहेत. या स्फोटात उडालेले भले मोठे दगड थेट येथील ग्रामस्थांच्या घरांवर पडून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ४० पेक्षा अधिक घरे यामध्ये बाधित झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास  भूसुरुंग स्फोटाने कोहराळी पाडा हादरला होता. सुदैवाने या पाडय़ातील ग्रामस्थ हे दिवसा आपल्या शेतीच्या कामानिमित्त घरांबाहेर असल्याने तसेच लहान मुले शाळेत गेली असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरांत असलेल्या वृद्ध ग्रामस्थांची भीतीने पळापळ झाली. घरांवर पडलेल्या दगडांमुळे घरांचे पत्रे आणि कौले फुटून घराच्या आतमधील टीव्ही, कपाट, फॅन, भांडी आणि इतर साहित्यांचे मोठं नुकसान झाले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 houses damaged due to blast for tunnel in dahanu taluka zws
First published on: 03-02-2023 at 20:16 IST