पालघर : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या ३४२ ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली आहे. बिनविरोध निवड झालेले सदस्य वगळता त्यानुसार ८७५१ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणूक मतदानानंतर निघालेल्या निकालातून त्यांचा निक्काल लागणार आहे.

जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींमधील थेट निवडणूक व विविध प्रभागांमधील ३४९० सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी एकूण ८७५१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच तर ७१० सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे ३३२ सरपंच व २७८० सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचपदासाठी १९८० तर सदस्यांसाठी ९३३१ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सरपंचपदासाठी १७ तर सदस्यपदासाठी १३५ अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यानंतर माघार घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत सरपंचपदासाठी ६१४ तर १६२७ सदस्यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यामुळे सद्य:स्थितीत थेट सरपंच निवडणुकीसाठी १३४९ तर सदस्यांसाठी ७४०२ उमेदवार रिंगणात आहेत.

Vanchit Bahujan Aghadi, Yavatmal,
यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
Buldhana Lok Sabha, queueless voting,
बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा ‘रांगविरहित मतदान’! काय आहे योजना जाणून घ्या…
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…
Congress, shetkari kamgar paksh
रायगडमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर

अनेक ठिकाणी सरपंच, सदस्य बिनविरोध
पालघर तालुक्यातून पाच सरपंच उमदेवार व १५३ सदस्य, वाडा तालुक्यात चार सरपंच व २०२ सदस्य, जव्हार तालुक्यात एक सरपंच व १२१ सदस्य, डहाणूमधून १११ सदस्य, विक्रमगडमधून ६९ सदस्य, मोखाडा तालुक्यातून ४९ सदस्य, वसई तालुक्यातून आठ, तर तलासरी तालुक्यात पाच सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ठिकाणी एकच उमेदवार निवडणूक प्रक्रियेत असल्याचे जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला कळविले आहे.

चार ग्रामपंचायती बिनविरोध
पालघर तालुक्यातील रावते व नागझरी तसेच वाडा तालुक्यातील मांडवा व वडवली तर्फे पौलघर या ग्रामपंचायतींमधील सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. तर डहाणू तालुक्यातील चंडीगाव येथे अनुसूचित जमातीचे उमेदवार उपलब्ध नसल्याने या ग्रामपंचायतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही.

बिनविरोध निवडीवरून श्रेयवाद
ग्रामपंचायत निवडणुकीत काही थेट सरपंचपदांसह वेगवेगळय़ा प्रभागांमधील सदस्य यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी वेगवेगळय़ा ठिकाणी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे आपल्या पक्षाला समर्थन असल्याचे दावे केले आहेत. या श्रेवादात एक सामाजिक संस्थेने उडी घेतली असून काही घटकांनी काही बिनविरोध झालेले सदस्यांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यासाठी रसद पुरविण्यास सुरू केल्याचे सांगण्यात येते.