पालघर : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या ३४२ ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली आहे. बिनविरोध निवड झालेले सदस्य वगळता त्यानुसार ८७५१ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणूक मतदानानंतर निघालेल्या निकालातून त्यांचा निक्काल लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींमधील थेट निवडणूक व विविध प्रभागांमधील ३४९० सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी एकूण ८७५१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच तर ७१० सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे ३३२ सरपंच व २७८० सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचपदासाठी १९८० तर सदस्यांसाठी ९३३१ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सरपंचपदासाठी १७ तर सदस्यपदासाठी १३५ अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यानंतर माघार घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत सरपंचपदासाठी ६१४ तर १६२७ सदस्यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यामुळे सद्य:स्थितीत थेट सरपंच निवडणुकीसाठी १३४९ तर सदस्यांसाठी ७४०२ उमेदवार रिंगणात आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8751 candidates will contest in gram panchayat elections amy
First published on: 06-10-2022 at 00:04 IST