scorecardresearch

‘पॉक्सो’ गुन्ह्यातील आरोपीला आजन्म कारावास

शिरगाव येथे एका कुटुंबातील कर्त्यां पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी व चार मुले परनाळी येथील अनंत चैत्या दांडेकर यांच्याबरोबर वास्तव्य करू लागले.

पालघर : बोईसरजवळील परनाळी येथील एका इसमाने त्याच्या अल्पवयीन सावत्र मुलीवर अतिप्रसंग केल्याचे उघडकीस आल्याने पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला पाच वर्षे सक्तमजुरीसह आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

शिरगाव येथे एका कुटुंबातील कर्त्यां पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी व चार मुले परनाळी येथील अनंत चैत्या दांडेकर यांच्याबरोबर वास्तव्य करू लागले. या कुटुंबातील एका १५ वर्षीय मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी अनेकदा बळजबरीने व धमकावून अनैतिक संबंध ठेवलले होते. तसेच यासंदर्भात कोणाला माहिती देऊ नये असे सांगून धमकावीत राहिले. जानेवारी २०१७ मध्ये ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर  प्रकार उघडकीस आला व तारापूर पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  तारापूर येथील तपास अधिकारी यांनी सबळ पुरावे गोळा करून ते सत्र न्यायालयात सादर केले असता जिल्हा न्यायाधीश-२ तथा सत्र न्यायाधीश एस.एस. गुल्हाने यांनी अनंत चैका दांडेकर यांना नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व दोन हजार रुपये दंड आकारणी केले आहे.  

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused of poxo crime sentenced to life imprisonment akp

ताज्या बातम्या