पालघर : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध पालघर जिल्हा वाहतूक विभागाने २१ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत आठवडाभरात ७०० पेक्षा अधिक वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, दोन लाख ६६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पालघर वाहतूक विभागाकडून राष्ट्रीय महामार्गावर तलासरी, कासा व मनोर तसेच पालघर व बोईसर आदी शहरी भागांमध्ये सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दोन तास ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर दिवसभर फिरत्या पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. या कारवाईवेळी नाकाबंदीसाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.

Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक
Kia vehicles will be expensive from April 1
‘किआ’ची वाहने १ एप्रिलपासून महागणार
1900 crore loan guarantee before code of conduct Rulings for Sugar Factories Mumbai
आचारसंहितेपूर्वी १,९०० कोटींची कर्जहमी; सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांसाठी घाईघाईने निर्णय

या विशेष मोहिमेत हेल्मेट न घालणाऱ्या ३८३ वाहन चालकांविरुद्ध, सुरक्षा पट्टा (सीट बेल्ट) न लावणाऱ्या २२१ वाहन चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती वाहतूक विभागप्रमुख आसिफ बेग यांनी दिली. त्याचबरोबर मद्यपान करून वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे पालघर, बोईसर या शहरी भागांत दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.