Premium

वीज थकबाकीदारांवर लवकरच कारवाई, ३३ ग्राहकांकडून साडेचार लाखांचा दंड वसूल

वीजपुरवठा खंडित केलेल्या शेजाऱ्यास वीज दिल्याने वाडय़ातील ३३ वीज ग्राहकांविरोधात महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे.

mahavitran
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

वाडा : वीजपुरवठा खंडित केलेल्या शेजाऱ्यास वीज दिल्याने वाडय़ातील ३३ वीज ग्राहकांविरोधात महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. या ग्राहकांकडून साडेचार लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ९५० वीजग्राहकांकडे ३१ मार्च २०२३ पूर्वीची ७५ लाखांची वीज थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी लवकरच मोहीम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहितीही महावितरणकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महावितरणने ३१ मार्च २०२३ पर्यंत ग्राहकांना वारंवार आवाहन करून थकीत वीज देयके भरण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही  शहरातील घरगुती वीज वापरणाऱ्या ९५० ग्राहकांनी थकीत देयकाचा भरणा केलेला नाही. जवळपास ही थकीत रक्कम ७५ लाखांहून लाखांहून अधिक आहे. त्यामुळे वीज देयक थकबाकीदारांविरोधात महावितरणने कारवाई सुरू केली आहे. त्यात काही थकबाकीदारांचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे. अशा काही ग्राहकांनी शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना वीज देणाऱ्या ३३ ग्राहकांविरोधात महावितरणने कारवाई केली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action will be taken soon on electricity defaulters 33 customers fined four and a half lakhs ysh