बोईसर : विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य मिळालं नसल्याची तक्रार केल्याच्या काही तासातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर चे लोकसभा अध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मनसेचे ठाण्यातील नेते आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार दाखल केले होते. या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य व आवश्यक सहकार्य न मिळाल्याने या सगळ्यांचा दारुण पराभव झाला होता. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी पालघरच्या आपले मन मोकळे करत व्यथा मांडली होती.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
leader Rahul Gandhi vs AAP supremo Arvind Kejriwal
काँग्रेस, आपच्या आरोपांनी ‘इंडिया’त विसंवाद
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
MLA Raju Karemores troubles increase petition filed in High Court
आमदार राजू कारेमोरेंच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात याचिका दाखल

हेही वाचा…Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महत्वाचा निर्णय; जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि उत्तम जानकरांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

निवडणुकीमध्ये पक्षाकडून पुरवण्यात आलेली आर्थिक रसद जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून स्थानीय पातळीवर मिळाली नसल्याची तक्रार बैठकीत पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. याबाबत अविनाश जाधव यांना वरिष्ठांकडून विचारणा केल्यानंतर त्यांनी ठाणे व पालघर जिल्हा पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

पालघरच्या स्थानीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्याविरुद्ध थेट तक्रार केल्याचा राग मनात धरून अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास समीर मोरे यांच्या तारापूर औद्योगिक वसाहतीच्या वेशीवर असणाऱ्या पाम गावातील कार्यालयात शिरून समीर मोरे यांना मारहाण केली तर त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून पळ काढला.

हेही वाचा…पुढील उपोषण आझाद मैदानात, तीर्थक्षेत्र तुळजापुरातून मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

या हल्ल्यात जखमी झालेल्या अतिश मोरे यांना बोईसर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली.समीर मोरे आणि त्यांच्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी पसरताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे . पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असून हा हल्ला अविनाश जाधव यांनी केलाच आरोप पालघर मधील मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे . पालघर ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष भावेश चुरी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून आपण या घटनेची माहिती राज ठाकरे यांना देखील दिली असून ते आम्हाला न्याय देतील असा विश्वास चूरी यावेळी व्यक्त केला अंतर्गत वाद हे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये असतात मात्र त्याला मनसेचे नेते अविनाश जाधव अशा बालिश पद्धतीने उत्तर देतील ही अपेक्षा नव्हती.भावेश चुरी, मनसे पालघर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सचिन पाटील

Story img Loader