सहकारी संस्थेचा विरोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: राज्यात एकीकडे विविध संस्थांमधील श्रीमंत मजुरांसंदर्भात चौकशी सुरू असताना पालघर जिल्ह्यात १२५ नवीन मजूर कामगार सहकारी सोसायटय़ांची नोंदणी करण्याचा छुपा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाला सहकारी संस्थेने विरोध दर्शविला असून मजुरांची योग्य पडताळणी केल्याशिवाय कामगार सहकारी संस्थांची स्थापना करू नये, अशी मागणी विभागीय संचालक यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ११७ मजूर कामगार सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. या संस्थांना शासनाच्या नवीन धोरणानुसार १० लाखांपर्यंत काम निविदा प्रक्रियाशिवाय करण्याची तसेच ई-टेंडिरग प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असतानादेखील अस्तित्वात असणाऱ्या संस्थांना आवश्यक प्रमाणात कामे मिळत नसल्याने त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची कुचंबणा होत आहे. मुळात अस्तित्वात असणाऱ्या संस्थांमध्ये गोरगरिबांना संधी मिळणे अपेक्षित असताना अनेक बलाढय़ नागरिकांनी तसेच श्रीमंत, विकासक व ठेकेदार असणाऱ्या व्यक्तींनी यापूर्वी संस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थांमधील सभासदांची योग्यता पडताळणी करण्यात येत नसल्याने गरीब व गरजू मजुरांवर अन्याय होत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt register bogus labor co operative society ysh
First published on: 15-01-2022 at 00:54 IST