scorecardresearch

वाडा पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा शनिवारी लिलाव

येथील पोलीस ठाणे हद्दीत बेवारस आढळून आलेली अनेक वाहने गेल्या काही वर्षांपासून धूळखात पडलेली आहेत. या वाहनांचा जाहीर लिलाव येत्या २३ एप्रिल रोजी करण्याचा निर्णय वाडा पोलीस ठाण्याने घेतला आहे.

वाडा : येथील पोलीस ठाणे हद्दीत बेवारस आढळून आलेली अनेक वाहने गेल्या काही वर्षांपासून धूळखात पडलेली आहेत. या वाहनांचा जाहीर लिलाव येत्या २३ एप्रिल रोजी करण्याचा निर्णय वाडा पोलीस ठाण्याने घेतला आहे.
या वाहनांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांचा अधिक प्रमाणात समावेश आहे. सध्या या ठिकाणी जागेअभावी नव्याने जमा होणारी वाहने ठेवण्यास जागा अपुरी पडू लागल्याने गेल्या १५ वर्षांपासून पडिक असलेल्या बेवारस वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई, ठाणे, कल्याण, अहमदनगर, वसई या ठिकाणी या वाहनांची नोंद आढळून येत नसल्याने या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Auction unused vehicles wada police station saturday amy

ताज्या बातम्या