scorecardresearch

स्वच्छ सर्वेक्षणात पालघर शहराचे सुशोभीकरण

स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत पालघर नगर परिषदेने शहराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे.

सार्वजनिक ठिकाणी चित्ररूपाने सामाजिक संदेश

पालघर : स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत पालघर नगर परिषदेने शहराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे.  सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी भिंतींवर  सामाजिक संदेश देणारी चित्रे रेखाटली आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या पन्नासात येण्याचा पालघर नगरपरिषदेचा मानस आहे.  यासाठी कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवणे,  पथनाटय़, व्हिडीओ संदेश, समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करून स्वच्छ सर्वेक्षण यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  विविध गृहसंकुल व गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन स्वच्छतेचे महत्त्व यावर जागरूकता निर्माण केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात पालघर नगर परिषद  स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकषांमध्ये येईल, असा विश्वास आहे.

 पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण शहरांमध्ये भिंती सजवण्याचे काम सुरु आहे.  जनजागृतीपर संदेश  फलकाद्वारे दिले जात आहेत. आरोग्य विभागांतील  स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे धडे, कचरा सफाई कर्मचाऱ्यांना  कचरा वर्गीकरण करण्यासाठी प्रोत्साहन केले जात आहे. यातून शहरामध्ये स्वच्छता नीटनेटकी राहील असे प्रयत्न केले जात आहेत. याचबरोबरीने प्लास्टिक बंदीसाठी विशेष मोहीम  हाती घेतली जाणार आहे.  नगर परिषद कार्यालयाच्या बाजूला कम्पोस्ट खत तयार केले जात आहे. त्यातून नगर परिषदेला काही प्रमाणात महसूलही मिळत आहे. स्वच्छ सर्वेक्षणसाठी पालघर नगर परिषद पुरेपूर प्रयत्न   करताना दिसून येत आहे.

फक्त स्वच्छ सर्वेक्षण नव्हे तर इतर वेळीही पालघर शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी व प्रशासनाचे प्रयत्न नेहमीच राहातात. आपले शहर म्हणून ते स्वच्छ ठेवण्याची आमची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांनी ही नैतिक जबाबदारी ओळखून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावावा.

– उमाकांत पाटील, विभागप्रमुख, आरोग्य खाते, नगर परिषद, पालघर

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Beautification clean survey social messages pictures public places ysh

ताज्या बातम्या