सफाळे, घोलवीरा येथील कामांची सुरुवात

पालघर : पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागात स्थानिक विकास, ग्रामविकास निधी व समाजकल्याण विभागांतर्गत ८० लाख रुपयांच्या निधीच्या विविध कामांचे भूमिपूजन पार पडले. आ. राजेश पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी हे भूमिपूजन केले.

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब

सफाळे पूर्व भागातील सोनावे रस्त्यासाठी, याच भागात साकव बांधण्यासाठी, पारगाव शाळेकडे जाणारा रस्ता, पारगाव पेट्रोल पंपापासून तलावाकडे जाणारा मार्ग, सफाळे व  करवाळे येथील रस्त्यासाठी, नवघर घाटीम अंतर्गत दहिवाली जिल्हा परिषद शाळेसाठीचा रस्ता अशा विविध व महत्त्वाच्या कामांसाठी एकूण ८० लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या विकासकामांमुळे जनतेला सुविधा प्राप्त होणार असल्याचे यावेळी आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. भविष्यातही या ग्रामीण बहुल परिसरात विकासकामांसाठी निधी देणार असल्याचे ते म्हणाले.

माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, सफाळे सरपंच अमोल जाधव व उपसरपंच बंटी म्हात्रे, शिक्षण संस्थेचे प्रभाकर पाटील, नागेश पाटील, योगेश पाटील व नागरिक यावेळी उपस्थित होते.

पालघर नगर परिषदेतही विकासकामे

पालघर नगरपालिका क्षेत्रात घोलवीरा येथील भाजी व मासळी बाजारांच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष व नगरसेवक-नगरसेविका यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हे बाजार गेली अनेक वर्षे दुरवस्थेत सापडले होते. यासाठी नगर परिषदेने सुमारे पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे मासे विक्रेत्या व भाजीपाला विक्रेत्या महिला रस्त्यावर बसण्याऐवजी बाजारात बसण्याची त्यांची सोय होणार आहे.