राष्ट्रीय महामार्गावर बसचा भीषण अपघात

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर बसचा अपघात झाला असून या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर बसचा भीषण अपघात
राष्ट्रीय महामार्गावर बसचा अपघात

कासा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर बसचा अपघात झाला असून या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मुंबई कडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर उभ्या असलेल्या ट्रकला खासगी बसची जोरदार धडक बसली. बस चालक गंभीर जखमी असून बस मधील इतर पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भाजपच्या लोकसभा प्रभाग योजनेत पालघरचा समावेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी