देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तारापूर अणुऊर्जा केंद्र तसेच भाभा अनुशक्ती केंद्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा एक जवान रायफल व 30 जिवंत काडतुसे घेऊन काल दुपारपासून फरार झाला आहे. सीआयएसएफ तसेच राज्य पोलीस यांच्यामार्फत या बाबत चौकशी सुरू असून राष्ट्रीय प्रकल्पांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मनोज यादव हा सीआयएसएफचा जवान गुरुवारी दुपारी तारापूर अणुशक्ती केंद्रात कामावर असताना अचानकपणे आपल्या शस्त्रास्त्रांचेसह कुठेतरी निघून गेला. त्याच्याकडे एलएमजी रायफल व 30 जिवंत काडतुसे असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तारापूर येथे असलेल्या सीआयएसएफ कॉलनीमध्ये एकटा राहणारा हा जवान काही तासानंतर पुन्हा कामावर रुजू होईल याच्या प्रतीक्षेत सीआयएसएफ चे स्थानिक अधिकारी व कर्मचारी होते मात्र सायंकाळ पर्यंत त्याचा ठाव ठिकाणा न लागल्याने तारापूर येथील पोलीस ठाण्यात सीआयएसएफ तर्फे माहिती देण्यात आली.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
13 Development Centers along Konkan Expressway, Sea Route
कोकण द्रुतगती महामार्ग, सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे; १०५ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती

हेही वाचा : अंबरनाथ : पूर्वीच्या कामगाराने घेतली गाडी, आयफोन मालकाच्या दुकानात चोरी झाल्याने झाला कामगारावर गुन्हा दाखल

दीड दिवसाच्या गणपतीच्या बंदोबस्तात अधिकतर पोलीस कर्मचारी असल्याने या प्रकरणात तक्रार नोंदवण्यास रात्र उजाडली. काल रात्री पोलिसांनी परिसरातील संशयाच्या सर्व ठिकाणांचा तपास केला तसेच त्याच्या मोबाईलच्या आधारे त्याचा ठाव ठिकाणा मोबाईल ट्रेकिंग द्वारे तपास सुरू केला आहे. तसेच अणुऊर्जा केंद्रातील तसेच सुरक्षा नाक्यांच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची देखील कसोशीने पाहणी करण्यात आली आहे. सध्या या जवानाचा मोबाईल फोन बंद असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजत असून घरगुती किंवा जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अग्निशस्त्र घेऊन पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच बरोबरीने या जवानाची मानसिक स्थिती बिघडल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत असून 30 जिवंत काढतोस हा पोलिसांच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : कल्याणमधील शिवसैनिकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले पत्र ; ‘उध्दव, साहेबांनी एका रिक्षा चालकाला सन्मानाची पदे दिली हीच त्यांची मोठी चूक’

तारापूर अणुऊर्जा केंद्राची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे असून या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक सुरक्षाविषयक त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. विशेष म्हणजे या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांट मधून अनेकदा महागड्या वस्तूंची चोरी झाल्यानंतर देखील त्याबाबत यशस्वी तपास होऊ शकला नव्हता. केंद्रामध्ये यापूर्वी एका सुरक्षारक्षकाने वाहन बेदरकारपणे चालून अपघात केल्याचे प्रकार घडला होता.
याविषयी पालघर चे अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अग्निशास्त्र व जिवंत काडतुसे घेऊन बेपत्ता झाल्याच्या वृत्ताचे समर्थन केले. या प्रकारे तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. तारापूर सीआयएसएफचे कमांडर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आपण महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्याचे त्यांनी लोकसत्तेला सांगितले.