पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात देहरे (किरमिरा) या आश्रम शाळेतील एका १७ वर्षीय युवतीने स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. देहरे आश्रम शाळेत ११ वी इयत्ते मध्ये शिकणाऱ्या पायलने दुपारच्या वेळी आश्रम शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. ही घटना समजल्यानंतर आश्रम शाळेतील शिक्षकाने तिला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र ९० टक्के भाजलेल्या या युवतीचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून तरुणीच्या मृतदेह नातवेकांच्या ताब्यात देण्यात आला. या आत्महत्या मागील नेमके कारण समजले नसले तरी या घटनेमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खळबळ माजली आहे.