Premium

पालघरमधील शहाळ्यांना शहरांत मागणी, बागायतदार मात्र उपेक्षित; व्यापाऱ्यांकडून जेमतेम २२ ते २८ रुपये नगाने खरेदी

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये सुमारे १,६०० हेक्टर क्षेत्रफळावर नारळ लागवड असून, दरवर्षी प्रति हेक्टरी १० हजार नारळांचे उत्पादन मिळते.

coconut production in palghar
पालघरमधील शहाळ्यांना शहरांत मागणी,

पालघर : यंदाच्या वर्षी मार्चपासून उन्हाचे चटके बसू लागल्याने शरीरामधील उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी शहाळय़ाला (नारळपाणी) मागणी आहे. सध्या उच्च दर्जाचे शहाळे प्रति नग ४५ ते ६० रुपये दराने विकले जात असले तरी पालघर जिल्ह्यातील बागायतदारांना जेमतेम २२ ते २८ रुपये प्रति नग दरावर समाधानी राहावे लागत आहे. त्यामुळे बाजारांमधील तेजीचा स्थानिक उत्पादकांना विशेष लाभ मिळत नसल्याचे दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये सुमारे १,६०० हेक्टर क्षेत्रफळावर नारळ लागवड असून, दरवर्षी प्रति हेक्टरी १० हजार नारळांचे उत्पादन मिळते. या भागातील शहाळे मुंबई, मुंबई उपनगर तसेच मीरा-भाईंदर, वसई विरार शहरात मोठय़ा प्रमाणात विकले जाते. पालघरमधील शहाळी व नारळांना दक्षिणेकडील राज्यांतून येणाऱ्या शहाळी व नारळांकडून स्पर्धा होते. जिल्ह्यातील शहाळय़ात २५० ते ३०० मिलीलिटर पाणी असून, त्याला विशिष्ट गोडी आहे. तसेच नारळातील कोवळा गर अथवा मलईला मुंबईकरांमध्ये मागणी आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Coconut demand in palghar city coconut production in palghar zws