scorecardresearch

काँक्रीट रस्त्यांना दोन महिन्यांतच तडे ; डहाणूतील पाटील पाडा आणि संत रोहिदास नगरचे रस्ते धोकादायक

डहाणू शहरातील पाटील पाडा व संत रोहिदास नगर या दोन प्रभागांतील सिमेंटच्या (क्रॉंक्रिट) रस्त्यांना अवघ्या दोन-तीन महिन्यांतच भेगा पडल्या आहेत.

डहाणू : डहाणू शहरातील पाटील पाडा व संत रोहिदास नगर या दोन प्रभागांतील सिमेंटच्या (क्रॉंक्रिट) रस्त्यांना अवघ्या दोन-तीन महिन्यांतच भेगा पडल्या आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे रस्त्याची दुर्दशा सुरू झाली आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. रस्ता अर्धा फूट उंच केल्यामुळे त्याच्या कडा धोकादायक बनल्या आहेत. 

 डहाणू शहरातील वॉर्ड क्रमांक एकमध्ये विद्युत विभागाचे कार्यालय ते घाचिया पाडा हा सिमेंट रस्ता  २००८ आणि २०१० मध्ये तयार करण्यात आला होता. परंतु तो निकृष्ट कामामुळे खराब झाला. त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. विशेष म्हणजे हा रस्ता अर्धा फूट उंच बनवल्यामुळे गावातील घरे  रस्ता पातळीच्या खाली गेली आहेत.  त्यामुळे पावसाळय़ात गावातील काही घरांमध्ये पाणी जात आहे, असे येथील  रहिवासी भूपेंद्र राऊत, यांनी सांगितले.   उंच रस्त्यामुळे गावातील कमलाकर मोरे या रहिवाशाला रस्त्याच्या कडेवरून पडून डोक्याला मार लागल्याने जीव गमवावा लागला होता. पाटील पाडा व संत रोहिदास नगर येथील रस्ता तयार करताना रहिवाशांनी ठेकेदाराला ही बाब लक्षात आणून दिली होती. मात्र ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले. दोन ते तीन महिन्यांतच या रस्त्याला तडे गेले आहेत. कमीत कमी या रस्त्याची तरी दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Concrete roads blocked two months roads patil pada sant rohidas nagar dahanu dangerous amy

ताज्या बातम्या