पालघर : दिवा-वसई रोड मेमू सेवा सुरू केल्यानंतर बोईसर-दिवा मेमू सेवा सुरू करण्यात आली. आता डहाणू-पनवेल मेमू सेवा सोमवार ११ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
याबाबत डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नागरिकांची होणारी गैरसोय मेमू सेवा सुरू करून दूर करावी, अशी मागणी केली होती. येत्या ११ ऑक्टोबरपासून डहाणू-पनवेल सेवा सुरू होणार आहे. ही गाडी सकाळी ०५.२५ वाजता डहाणू येथून सुटून ०८.५५ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाला पनवेलहून सायंकाळी ०७.०५ वाजता सुटणारी मेमू रात्री १०.३० वाजता डहाणू येथे पोहोचेल. दरम्यान, मेमूप्रमाणेच शटल, पॅसेंजर सेवा सुरू कराव्यात तसेच एक्स्प्रेस गाडय़ांना सफाळे, पालघर, बोईसर, वाणगाव व डहाणू येथे पूर्ववत थांबे द्यावे, अशी मागणीही संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.