CPM Vinod Bhiva Nikole in Dahanu Vidhan Sabha Election 2024 डहाणू विधानसभा मतदारसंघ १२८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, डहाणू मतदारसंघात पालघर जिल्ह्यातील १. तलासरी तालुका आणि २. डहाणू तालुक्यातील सायवान, मल्याण, डहाणू ( Dahanu ) ही महसूल मंडळे आणि डहाणू ( Dahanu ) नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. डहाणू हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे विनोद भिवा निकोले हे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. विनोद निकोले यांनाच यंदाच्या निवडणुकीत पुन्हा तिकिट देण्यात आलं आहे.
डहाणू विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघाचा भाग
डहाणू विधानसभा मतदारसंघ हा पालघर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सीपीएम पक्षाचे निकोळे विनोद भिवा ७२ हजार ११४ मतं मिळवून विजयी झाले. भाजपाचे धणारे पास्कल जन्या यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचं अंतर ४७०७ मतं होतं
हे पण वाचा- पालघर जिल्ह्यात नेतेमंडळींचे पक्षांतर
डहाणू हे महाराष्ट्रातील शांत सुंदर गाव
डहाणू महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील गाव आहे. या गावाला सुंदर व शांत असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथून जवळच डहाणूचा किल्ला आहे. डहाणूवरूनच आपण नरपडचा समुद्रकिनारा तसेच येथून २७ कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील महालक्ष्मीचे जागृत स्थानही पाहू शकतो. तसेच डहाणू आगर येथील केवडावंतीचे मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. मूळ डहाणू परिसर हा आदिवासी वस्ती असलेला परिसर असल्यामुळे येथील परिसरात आदिवासी पारंपरिक सण आणि उत्सव तसेच जग प्रसिद्ध वारली चित्रकला पाहावयास मिळते.
डहाणू आदिवासी बहुल वस्तीचं
मुख्यतः आदिवासी समाजाची वस्ती आहे. आदिवासी जमातीत शुभ प्रसंगी तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविले जाते. आदिवासी समाजातील ठराविक लोक हे तारपा वाजवणारे असतात आणि त्यांना तारपाकरी नावाने ओळखले जाते.तारपाकरी लोकांची संख्या कमी होत आहे. डहाणू तालुक्यातील वाघाडी गावातील सचिन सातवी ह्यांनी आयुष संस्थेतर्फे तारपा वाद्यांची निर्मिती आणि तारपा वाजविण्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करायला सुरुवात केली आहे. तारपा हे पालघर या आदिवासी जिल्ह्याचा मानबिंदू आहे. लग्नसोहळा, विविध महोत्सव, कौटुंबिक कार्य इत्यादी कार्यक्रमात तारपा नृत्य संगीत सादर केले जाते.
२००९ मधल्या विधानसभा निवडणुकीत काय निकाल लागला?
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत डहाणू विधानसभा मतदारसंघातून सीपीएमचे राजाराम ओजारे ६२ हजार ५३० मतांनी निवडून आले. त्यांनी कृष्णा घोडा या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.
२०१४ मध्ये भाजपाचा विजय
भाजपाच्या पास्कल धणारे यांनी ४४ हजार ८४९ मतं मिळवून २०१४ च्या निवडणुकीत सीपीएमच्या बारक्या मंगत यांचा पराभव केला. त्यांना या निवडणुकीत २८ हजार १४९ मतं मिळाली.
२०१९ मध्ये काँटे की टक्कर
भाजपाच्या पास्कल धणारे यांनी सीपीएमच्या विनोद निकोळेंना २०१९ च्या निवडणुकीत काँटे की टक्कर दिली. पण या निवडणुकीत अवघा ४७०० मतांनी पास्कल धणारेंचा पराभव झाला आणि विनोद निकोळे विजयी झाले. २०१४ चा अपवाद वगळता या मतदारसंघावर सीपीएमचं वर्चस्व आहे. आता येत्या निवडणुकीत भाजपा किंवा महायुती हा मतदारसंघ जिंकण्यास त्यांना कुणाचा सामना करावा लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाजपाने ही जागा निवडून आणली तर या मदारसंघावर ते पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करतील.