पालघर : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सोनोपंत दांडेकर कला, वा. श्री. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय, पालघर यांच्या वतीने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) यांच्या सहकार्याने मेगा जॉब फेअर २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा जॉब फेअर शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
या जॉब फेअरमध्ये सध्याचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (YCMOU) केंद्राचे विद्यार्थी तसेच इतर महाविद्यालयातील इच्छुक उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. या उपक्रमामध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी, स्वयंरोजगाराच्या संधी, महाराष्ट्रभर इंटर्नशिपच्या संधी तसेच ४५०० पेक्षा अधिक नोकरीच्या जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अॅमेझॉन, बजाज, आयटीसी, एचडीएफसी यांसारख्या नामांकित कंपन्यांचा या जॉब फेअरमध्ये सहभाग असणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी ४ ते ५ प्रतींचे रिझ्युमे, आधार कार्डची साक्षांकित एक प्रत आणणे आवश्यक असून ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रवेश पूर्णपणे मोफत असून नोंदणी अनिवार्य आहे. (नोंदणी लिंक – https://forms.gle/TocFGtneoaLXL3bH8)
या जॉब फेअरचा पालघर परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे यांनी प्रतिपादन केले आहे.
अधिक माहितीसाठी व सहभागासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. हर्षद वनमाळी ९६९९३७२१५४, डॉ. शैलजा पालन ८६९८७०७०४३, डॉ. बाळासाहेब रहाणे ९४०३०७७२९०, डॉ. रोहित गायकवाड ९४२३७१९१३७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जॉब फेअरचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख यांनी केले आहे.

